सोलापूर शहर मध्य मधून प्रमोद मोरे शिवसेनेकडून प्रबळ दावेदार ; नव्या चेहऱ्याने इतर इच्छुकांना टेन्शन
शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. महायुतीच्या माध्यमातून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला सुटतो. त्यामुळे शहर मध्यची उमेदवारी शिवसेनेकडून मिळावी म्हणून अनेक दिग्गज प्रयत्न करीत आहेत. त्यात आता नव्या चेहरा समोर आला आहे. जनसेवक प्रमोद ब्रह्मानंद मोरे यांनी सेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आपले वजन वापरत उमेदवारी खेचून आणणार अशी चर्चा मतदारसंघात चांगलीच रंगली आहे.
प्रमोद मोरे हे मागील काही वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्यात एक जनसेवक म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. यापुढील काळामध्ये शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास मतदार संघाचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेसोबतच भाजपाचे देखील वर्चस्व अधिक आहे. शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्यास प्रदीप मोरे यांचे भाजपाचे असलेले स्नेहाचे ऋणानुबंध याचा नक्कीच फायदा होऊन शहर मध्य मधून सर्वाधिक मताधिक्याने प्रमोद मोरे हे निवडून येतील असे नागरिकांमधून बोलले जात आहे. शहर मध्य मध्ये हिंदुत्वाची ओळख अबाधित ठेवण्यासाठी ते नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वास ही व्यक्त केला जात आहे.
प्रमोद मोरे यांच्या सामाजिक कार्याचे ओळख पक्षाचे वरिष्ठ नेते नक्कीच दखल घेतील आणि उमेदवारी जाहीर करतील अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.