Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 June 2026
in political
0
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र छाननी दरम्यान राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले हे काँग्रेस पक्षाचे उमेदवाराला सुचक होते परंतु त्यांनीच या उमेदवारावर हरकत घेत सूचक म्हणून आपली सही नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने काँग्रेसचा या निवडणुकीत गेम झाला.

जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या साठी ही विधान परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे भारतीय जनता पार्टी कडून माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पालकमंत्री गोरे आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या निवडणुकीसाठी शिस्तबद्ध नियोजन केल्याचे पाहायला मिळत आहे.

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले होते ते या निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्राच्या छाननीकडे. प्रथमच विधान परिषदेची जागा काँग्रेसला सुटल्याने पंढरपूरचे माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीसाठी सूचक म्हणून मतदारांपैकी दहा सदस्य यांची सही लागते. दरम्यान फत्तेपुरकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही केलेले पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांनीच फत्तेपुरकर यांच्या अर्जावर हरकत घेत यातील सही माझी नाही असे म्हणून त्यांनी आपले प्रतिज्ञापत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिले आहे.

सकाळी अकराच्या दरम्यान नागेश भोसले हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे असे कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.

माहिती घेतली असता समजले की, पालकमंत्री जयकुमार गोरे हे सकाळी 11 वाजता सोलापुरात दाखल झाले होते. त्यांनी हॉटेल बालाजी सरोवर मध्ये बसून सकाळची सूत्र हलवली. जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे हे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यासह ठाण मांडून होते. दुपार नंतर पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार दिलीप माने ही नेतेमंडळी शहाजी भाऊ पवार यांच्या यमाई कंट्रक्शन मध्ये बसून या निवडणूक प्रक्रियेच्या हालचालींवर लक्ष ठेवले.

खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवडणूक निर्णय अधिकारी कार्तिकेयन यांची भेट घेतल्याचे दिसून आले. दुपारी दीड वाजल्यापासून काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे उमेदवार फत्तेपूरकर हे रात्रीच्या आठ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडून होते.

रात्री आठच्या दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी कार्तिकेएन यांनी आपला निकाल दिला. या निकालात रमेश बारस्कर यांनी राजेंद्र राऊत यांच्या अर्जावर घेतलेल्या चारही हरकती फेटाळण्यात आल्या. काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावर नागेश भोसले यांनी घेतलेली हरकत मान्य करून जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी फत्तेपुरकर यांचा अर्ज रद्द ठरवला आहे. त्याचबरोबर न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार वाघमोडे यांचाही अर्ज बाद करण्यात आला आहे.
आता या निवडणुकीत हे उमेदवार रिंगणात
केशव दौलतराव बनगर (काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी )
राजेंद्र विठ्ठल राऊत (भारतीय जनता पार्टी )
अक्कलकोट नागेश हरिभाऊ बाबराव (अपक्ष)
जीवन उत्तमराव जानकर (अपक्ष)
धनंजय महादेव डिकळे (अपक्ष)
महेश देविदास साठे (अपक्ष)
रमेश नागनाथ बारस्कर (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहेत.
आता राहिलेल्या दोन दिवसात कोण कोण माघार घेणार आणि भारतीय जनता पार्टी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: @political newsVidhan Parishad 2026
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

Next Post

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998553
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group