Friday, November 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 September 2026
in crime
0
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

सोलापूर : दिनांक २५.०८.२०२६ रोजी रात्री ९.०० ते २६.०८.२०२६ सकाळी ११.३० च्या दरम्यान जामगाव, ता. माढा येथे फिर्यादीचे राहते घरात अज्ञात चोरट्याने बळजबरीने प्रवेश करून फिर्यादीचे वडील अशोक भीमान्ना मुळे (वय ६१) यांना घातक हत्याराने डोक्यात मारहाण करून जीवे ठार मारले आणि घरातील लोखंडी कपाट उचकटून २,४०,००० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद विजयकुमार अशोक मुळे (वय ३०) यांनी दिली होती. त्यावरून माढा पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल झाला.

गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने घटनास्थळी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी भेट देऊन माहिती घेतली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना समांतर तपासासाठी ४ स्वतंत्र पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विजय शिंदे व त्यांच्या पथकाने गुन्हा घडल्यानंतर ३ दिवस जामगावात तळ ठोकून घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले. घटनास्थळाजवळ मिळालेल्या परिस्थितीजन्य पुराव्यावरून आरोपीबाबत सुगावा लागला. गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हा गुन्हा जामगावचा रहिवासी अजयकुमार गौतम चव्हाण याने मोटारसायकलचा वापर करून केला आहे.

माहिती घेतली असता तो मागील दोन वर्षांपासून जामगावात न राहता लऊळ, ता. माढा येथे राहत असून अधूनमधून जामगावात येत असल्याचे समजले. पोलीस पथक पाठीवर असल्याचा संशय आल्याने त्याने मोबाईल बंद करून पलायन केले होते. सीसीटीव्ही फुटेजवरून तो कलबुर्गी, कर्नाटक भागात असल्याचे समजले.

पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सपोनि विजय शिंदे, सपोफौ नारायण गोलेकर व पथकाला कलबुर्गीला रवाना केले. वाडी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर तो वावरत असल्याची माहिती मिळाल्याने वाडी रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीचे नाव अजयकुमार गौतम चव्हाण (वय ३१, रा. जामगाव, हल्ली रा. लऊळ, ता. माढा) असे आहे.

चौकशीत त्याने कबुली दिली की, कर्जबाजारी झाल्याने पैशाची गरज असल्याने चोरीच्या उद्देशाने तो फिर्यादीच्या घराच्या पाठीमागील पाईपवरून घरात शिरला. वरच्या खोलीचे लोखंडी कुलूप त्याने *युट्युब व्हिडिओमध्ये पाहिलेल्या पद्धतीने सिरिंजच्या सहाय्याने कुलपात पेट्रोल टाकून पेटवून* उघडले. कपाट उचकटत असताना झोपलेले अशोक मुळे जागे झाले व त्यांनी त्याला ओळखल्याने त्याने जवळील हातोड्याने त्यांच्या डोक्यात जबर मारहाण करून जीवे ठार मारले आणि दागिने चोरून पळ काढला.

आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी माढा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पुढील तपास माढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रोहित शिंदे करीत आहेत.

*ही उल्लेखनीय कामगिरी* पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे (पंढरपूर विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सपोनि विजय शिंदे, बालाजी कांबळे, संजय राठोड व पथकातील नारायण गोलेकर, सलीम बागवान, रवि माने, अतुल घाडगे, दशरथ गोरे, बाबासाहेब मुंडे, अश्विनी गोटे, अनवर अत्तार, समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, योगेश जाधव, सुरज रामगुडे, प्रमोद गायकवाड, मनोज राठोड, रतन जाधव, सुनील पवार तसेच माढा पोलीस ठाण्याकडील सपोनि रोहित शिंदे, पोउपनि मोहमद शेख, विवेक माने, सचिन देशमाने यांनी बजावली आहे.

Tags: @SolapurZpBJPCrime branchPolice SP
SendShareTweetSend
Previous Post

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

Next Post

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2006396
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group