धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन
सोलापूरच्या राजकीय क्षेत्रातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन झाले आहे. त्यांची अंतयात्रा मोरारजी पेठ पोलीस लाईन येथील राहत्या घरा पासून निघून रविवार 30 ऑगस्ट रोजी मोदी मुस्लिम कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
काही दिवसांपूर्वी दुचाकी वर जात असताना सोलापूर शहरात त्यांच्या गाडीला अपघात झाल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते या उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती यांनी दिली.
रियाज शेख अतिशय धडाडीचा कार्यकर्ता म्हणून सोलापुरात त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये ते सक्रिय होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे अतिशय निष्ठावंत आणि कट्टर कार्यकर्ते म्हणून रियाज शेख यांची ओळख होती.
















