Wednesday, September 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 May 2026
in crime
0
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी
0
SHARES
348
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली पदार्थ मिळून आला असून त्याची किंमत सुमारे दोन कोटी रुपये एवढी आहे. या प्रकरणात दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. चार दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 12/05/2026 रोजी सकाळी 06.00 वा. गुन्हे शाखेकडील नेमणूकीस असलेले सपोनि दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथक सोलापूर शहर हद्दीमध्ये पेट्रालिंग करीत असताना पोशि भारत पाटील यांना गोपनिय खबर मिळाली की मुस्लीम कब्रस्तान, व्ही.आय.पी. रोडकडून संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडच्या कडेला एक संशयीत कार उभी असून त्यामध्ये अंमली पदार्थ असण्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार नमुद पथकाने सदर ठिकाणानजीक जावून गोपनीयरित्या पाहणी केली असता एक पांढऱ्या रंगाची ह्युन्डाई व्हेन्यु कंपनीची कार क्रमांक MH-13 ES- 1411 ही संशयीत रित्या उभी असल्याची दिसले.

सदर वाहनाबाबत तात्काळ अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना अवगत करून त्यांना नमुद ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली नमुद कारला गराडा घालुन चालक सिटवर बसलेल्या व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याचेकडे केलेल्या चौकशीत त्याचे नाव रिजवान शब्बीर खान वय 26 वर्षे रा. घर नं. 123 अंबिका नगर भाग-3, उमर खलीफा मस्जिदजवळ, नई जिंदगी, सोलापूर असे असल्याचे आढळले.

त्यानंतर दोन पंचांसमक्ष सपोनि दत्तात्रय काळे व तपास पथक यांनी ताब्यात घेतलेल्या इसमाची व नमुद कारची झडती घेतली असता कारमध्ये ड्रायव्हींग सिटच्या डाव्या बाजुस असलेल्या ड्रॉवरमध्ये एक राखाडी रंगाची प्लास्टीक पिशवी मिळून आली. सदर पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाचा स्फटीक पदार्थ दिसुन आला. सदर पांढऱ्या पदार्थाबाबत ताब्यात घेतलेल्या इसमाकडे विचारणा केली असता, सदर पदार्थ हा एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली पदार्थ असल्याचे त्याने सांगितले.

त्यामुळे तात्काळ पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर कडील फॉरेन्सिक टिमला पाचारण करून सदर पांढऱ्या रंगाच्या पदार्थची रासायनीक तपासणी केली. सदरची पावडर ही Mephedrone (एम.डी.) अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणी एनडीपीएस अॅक्ट अन्वये कायदेशीर प्रक्रिया पार पाडत सविस्तर पंचनामा करण्यात आला. त्यानंतर रिजवान शब्बीर खान याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने Mephedrone (एम.डी.) अंमली पदार्थ असलेली प्लास्टीक पिशवी ही इसम नामे साहील पिरजादे रा. सोलापूर व एक अनोळखी इसम यांनी अफजल मुर्शद रा. मुस्लीम कब्रस्तान जवळ, सोलापूर याचेकडे दिली होती व अफजल मुर्शद याने सदरची पिशवी ही कारच्या ड्रावरमध्ये ठेवली असल्याचे सांगितले.

त्यानुसार इसम नामे- 1) रिजवान शब्बीर खान वय- 26 वर्षे रा. घर नं. 123 अंबिका नगर भाग-3, उमर खलीफा मस्जिदजवळ, नईजिंदगी, सोलापूर, 2) साहील सिकंदर पिरजादे रा. सोलापूर, 3) अफजल मुर्शद रा. मुस्लीम कब्रस्तान जवळ, सोलापूर यांचे विरूध्द सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गु.र.नं.- 378/2026 एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8 (क), 21 (क), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे हे करीत असून आरोपी नामे 1) रिजवान शब्बीर खान व 2) साहील सिकंदर पिरजादे वय 25 रा. फ्लॅट नं. 406 अल्तमश अपार्टमेंट मंत्रीचंडक नगर, सोलापूर यांना अटक केली आहे. नमुद आरोपींना 04 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tags: CrimeMafedrine
SendShareTweetSend
Previous Post

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

Next Post

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

ताज्या बातम्या

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026

क्राईम

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1999369
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group