Wednesday, May 13, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 May 2026
in crime
0
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या
0
SHARES
435
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच देण्याकरिता पाचशे रुपयाची लाच घेणाऱ्या बांधकाम कामगार विभागातील दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपी खाजगी इसम विनोद विजय गाडेकर, वय ३७ वर्षे, पद ऑपरेटर भांडी वाटप केंद्र, उपळाई (बु.) रा. उपळाई (बु.) ता. माढा, जि. सोलापूर व दिनेश मनोहर वाघमारे, वय २३ वर्षे, पद ऑपरेटर भांडी वाटप केंद्र, उपळाई (बु.) रा. माळी वस्ती, उपळाई (बु.) ता. माढा, जि. सोलापूर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आलंय.

यातील तक्रारदार हे बांधकाम कामगार असून, त्यांनी कामगारांकरीता शासनाकडून मोफत मिळणाऱ्या भांडीसंच साठी दि.२७/०३/२०२६ रोजी अर्ज केला होता. सदर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांना मोफत देण्यात येणारे गृह उपयोगी भांडी संच देण्यासाठी तक्रारदार यांना प्रथम १२००/- रुपये व तडजोडीअंती ५००/- रुपये लाचेची मागणी यातील आरोपी क्र. १ हे करत असल्याची तक्रार दि.१६/०४/२०२६ रोजी तक्रारदार यांनी केली.

त्यानंतर तक्रारदार यांनी तक्रारदार दिल्यानंतर दि. १६/०४/२०२६ रोजी तक्रारीची पडताळणी दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली. आरोपी क्र. १ गाडेकर यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा मार्फत मोफत देण्यात येणारे भांडे संच देण्यासाठी ५००/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

आज दि.०६/०५/२०२६ रोजी महाराणी लक्ष्मीबाई विद्यालयातील कार्यालयामध्ये आरोपी क्र. १ गाडेकर यांनी आरोपी क्र. २ वाघमारे यांचे समक्ष तक्रारदार यांना लाचेची रक्कम आरोपी क्र. २ वाघमारे यांचेकडे देण्यास सांगितले व वाघमारे यांनी ५००/- रुपयाची लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता नमुद दोन्ही आरोपी यांना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले आहे. यांचेविरुद्ध माढा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये भांड्यांचा संच सेफ्टी किट अत्यावश्यक वस्तूंचे साहित्य असे तीन वेगवेगळे संच मिळतात आणि हे संच घेण्यासाठी बांधकाम कामगारांना शहराच्या बाहेर एकच गोडाऊन मध्ये जावे लागते आणि त्या ठिकाणी संबंधित ऑपरेटर आणि कर्मचारी प्रत्येकी कामगारांकडून पाचशे रुपये घेतले शिवाय ते संच देत नाहीत अशी ओरड कायम ऐकण्यास मिळते. त्यामुळे झालेली कारवाई योग्य असून यापुढे असे पैशाची बेकायदेशीर मागणी होणार नाही याची काळजी बांधकाम कामगार विभागाने घ्यावी.

Tags: Anti curruption redबांधकाम कल्याणकारी मंडळ
SendShareTweetSend
Previous Post

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

Next Post

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980132
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group