भाजपच्या बालेकिल्ल्यात मनसेची भगवी रॅली ; प्रत्येकाच्या तोंडी महादेव कोगनुरे यांचेच नाव
सोलापूर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार प्रचंड शिगेला पोहोचला आहे सर्वांचे लक्ष लागलेल्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात यंदा अतिशय काटे की टक्कर पाहायला मिळते.
या सर्वांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार महादेव कोगनुरे यांनी मात्र पद्धतशीर आपला प्रचार सुरू ठेवला आहे. गावोगावी, प्रत्येकाच्या घरोघरी, बांधावर, कट्ट्यांवर जाऊन त्यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत.
बुधवारी भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या शहरातील नीलम नगर भागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भगवी प्रचार रॅली काढण्यात आली. या विराट अशा रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या पदयात्रेत नीलम नगर भागातील नागरिकांनी कोगनुरे यांचे ठिकठिकाणी स्वागत केले.
यापूर्वी महादेव कोगनुरे यांनी एम के फाउंडेशनच्या माध्यमातून या भागातील नागरिकांना मदतीचा हात दिल्याने प्रत्येकाच्या तोंडी महादेव कोगनुरे हेच नाव ऐकायला मिळत आहे.