पचका झाला रे ! या नेत्यांना नियोजन समितीच्या बैठकीला बसता येणार नाही ; सरकारने घेतला मोठा निर्णय

सोलापूर : 2022 नंतर राज्यात जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्या निवडणुका न झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना जिल्हा नियोजन समितीचा निमंत्रित सदस्य म्हणून संधी मिळाली. त्यामुळे अनेकांनी आपल्या चार चाकी वाहनावर मस्तपैकी भारतीय राजमुद्रा लावत खाली जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून लिहिले होते. त्याचा फायदा त्यांना बराच झाला. परंतु आता या सरकारने चांगलीच मेक मारली असून यापूर्वीचे सर्वच नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यांचे सदस्य पद रद्द करण्यात आले आहे तसा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
सोलापूर जिल्हा नियोजन समितीची सभा 30 जानेवारी रोजी होत आहे. त्यामुळे अनेक माजी सदस्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते या नियोजन समितीच्या बैठकीनंतर मोठ्या प्रमाणात निधी मिळेल आणि तो वाटप करता येईल या अवीर्भावात अनेक राजकीय नेते होते पण त्यांची आता अडचण झाली आहे.
शासनाने थेट आदेश काढून या सर्वांचेच निमंत्रित सदस्य पद रद्द कले असल्याने केवळ आता या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार आणि खासदार यांनाच बैठकीला बसता येणार आहे.
जो माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, महापालिकेचा गटनेता, महापालिकेचा नगरसेवक अशांनाच जिल्हा नियोजन समितीचा निमंत्रित सदस्य करण्यात आले होते. इतर कार्यकर्त्यांना मात्र या समितीवर संधी मिळाली नाही पण शासन निर्णयानंतर आता अशांच्या नेतेगिरीला चाप बसला आहे.