सोलापूर भीम सैनिकांचा जल्लोष अन् प्रशासकीय अधिकाऱ्यांचा झाला सत्कार
सोलापूर÷ विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरामध्ये मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा उभारणी करणे बाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समितीच्या आयोजित बैठकीमध्ये त्यागमूर्ती माता रमाई पुतळा उभारणीकरणे बाबत अंतिम मंजुरी मिळाल्याबद्दल सोलापूर शहरांमध्ये विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमसैनिकांनी मिठाई वाटप करत जल्लोष साजरा केला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांच्या प्रतिमेस भीमसैनिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून भीमसैनिकांमध्ये मिठाई वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष चंदनशिवे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सोलापूर शहरामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेल्या या सोलापूर नगरीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयाती मध्ये असताना 14 वेळा आलेले आहेत तसेच माता रमाई सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत या अनुषंगाने सोलापूर शहरांमध्ये माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा उभारणी करण्याबाबतचा विषय गेल्या 4 र्षापासून प्रलंबित होता या विषयाच्या अनुषंगाने आज सोलापूर शहरांमध्ये माता रमाई आंबेडकर यांचा जो पुतळा अनेक वर्षापासून प्रलंबित होता या सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सध्याचे कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून सुशोभीकरण करण्यासाठी 1 कोटी पेक्षा जास्त निधी देण्यात आला होता परंतु विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान मध्ये माता रमाई यांचा पुतळा उभारणी बाबत सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटना आणि भीमसैनिकांची एकमेव इच्छा होती या विषयासाठी त्या वेळेच्या सोलापूर महानगरपालिका सभागृहातील नगरसेवक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूला माता रमाई यांचा पुतळा असला पाहिजे या विषयासाठी सभागृहांमध्ये मंजुरीसाठी तो विषय आले असता त्यावेळेस सोलापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या पैकी 28 नगरसेवकांनी माता रमाई यांचा पुतळा व्हावा म्हणून स्वतःच्या मानधना मधून 3 लाखापेक्षा जास्त रक्कम जमा केला. तो निधी कमी पडत होता .निधी कमी पडत असताना आम्ही पुढे येऊन लागणारा जो निधी 10 लाखाचा निधी कमी पडत होता तो निधीसं बंधित मूर्तिकार दिला .
यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून जे शासन स्तरावर मान्यता घेऊन आज सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी माता रमाई यांचा पुतळा उभारण्यासाठी अंतिम मंजुरी दिली. माता रमाई पुतळा उभारणीसाठी ज्याने मंजुरी दिली सोलापूरचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांचे अभिनंदन करतो आणि माता रमाई पुतळा उभारण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेतील ज्या नगरसेवकांनी स्वतःचे मानधन दिले त्यांचे सुद्धा अभिनंदन करतो तसेच सोलापूर शहरातील विविध पक्षातील नेत्यांनी व विविध सामाजिक संघटनेतील नेत्यांनी मला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही अभिनंदन करतो.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शांतीकुमार नागटिळक, प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख गौतम चंदनशिवे, चंद्रकांत सोनवणे , पॅंथर गौतम नागटिळक ,अविनाश भडकुंबे, सर्पमित्र दीपक इंगळे ,भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य आणासाहेब वाघमारे , बौद्धाचार्य राजेंद्र माने, सामाजिक कार्यकर्ते विनोद इंगळे ,देविदास लंकेश्वर, पी बी ग्रुप अध्यक्ष आदित्य चंदनशिवे , उमेश रणदिवे सिद्धांत सुर्वे,रल्हाद रोकडे, धम्मप्रकाश दुडे, कमलाकर बनसोडे, अजित अंकुश, आशिष पात्रे ,विनायक क्षीरसागर ,दीपक वाघमारे , बाळू डोळसे, नागनाथ आखाडे, अजित वाघमोडे ,राजाराम लोखंडे ,मुन्ना आखाडे ,अमर सोनकांबळे, नितीन शिरसाट , सिद्धार्थ दुपारगुडे, सचिन आवारे, लखन चंदनशिवे, प्रशांत गवळी, धना कापुरे ,संतोष गायकवाड, अजय इंगळे , श्रीपती गायकवाड, रवी कांबळे ,बाळू शिंदे, दत्ता कांबळे ,श्रीनिवास गायकवाड, महादेव चंदनशिवे, अविनाश बार्शी, सिद्धार्थ दुपारगुडे ,राहुल बागले ,बाळराज जाधव, शिरीष गायकवाड ,सुजाता सोनवणे जया कदम ,नम्रता कांबळे ,कोमल घोडकुंबे, रेखा सोनवणे, दगडूबाई सोनवणे ,हौसाबाई अंकुश, गुड्डी अंकुश , पूनम माळाळे, शुभांगी डोळसे, आम्रपाली साबळे ,लक्ष्मी चंदनशिवे ,राधा मस्के, चंद्रकांता चंदनशिवे ,लक्ष्मी अंकुश ,आशा चंदनशिवे इत्यादी उपस्थित होते .