Monday, September 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

वाल्मीक कराडच्या मुलाला सोलापुरात दिलासा ; जिल्हा न्यायालयात….

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 January 2025
in crime
0
सोलापुरात सुशिल कराड विरूद्धच्या खटल्यात मोठी घडामोड समोर ; उद्या होणार….
0
SHARES
730
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाल्मीक कराडच्या मुलाला सोलापुरात दिलासा ; जिल्हा न्यायालयात….

सोलापूरः वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशिल कराड यांचे नावे असलेली फर्म सान्वी ट्रेडर्स व त्यांचे पत्नीचे नावे असलेली फर्म अन्वी इंटरप्राइझेस या फर्ममध्ये फिर्यादी महिलेचा पती मॅनेजर पदावर कामास होता. त्याने सन २०२०-२०२१ २०२१-२०२२ २०२२-२०२३ या आर्थीक वर्षामध्ये व्यापा-याकडील होणारी वसुली स्वतःच्या व यातील फिर्यादी पत्नीचे नावे वळती करून घेवून रक्कम रु. १ कोटी ८लाख रूपयांचा अपहार केल्याचा सुशिल कराड यांनी दि. १९ जुलै २०२४ रोजी परळी शहर पोलिस स्टेशन येथे दाखल केली आहे. तेंव्हापासून आजतागायत फिर्यादी व तिचा पती फरार आहेत. त्यांनी न्यायालयातुन जामिन ही घेतलेला नाही अथवा पोलिसांना सहकार्य करण्यासाठी हजर ही झालेले नाहीत असे असताना प्रस्तुत प्रकरणातील फिर्यादी महिलेने जबरदस्तीने गाडया, सोने व प्लाँट जागा खरेदीखतान्वे लिहून घेतल्याचा तक्रारी अर्ज एम आय डी सी पोलिस स्टेशन सोलापूर येथे दाखल केलेला होता.

परंतु घडलेल्या घटना या परळी शहरातील असलेने पोलिसांनी तिकडे तक्रार दाखल करण्याचे समजपत्र फिर्यादीस दिलेले होते. त्यानंतर फिर्यादी महिलेने पोलिस महासंचालकाकडे तक्रार दाखल केली त्याचा तपास परळी,बीड पोलिसांनी केला.त्यामध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदवून व पुरावा गोळा केल्यानंतर फिर्यादी महिलेचे तकारीत तथ्य नसलेचे व तिने अपहाराच्या गुन्हयास शह देण्यासाठी तक्रार केल्याचे निरीक्षण नोंदवून पोलिसांनी गुन्हा घडला नसल्याचा अहवाल दिला. त्यामुळे फिर्यादी महिलेने सोलापूर येथील न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केलेली होती.

सदर प्रकरणात न्यायालयाने पोलिसांकडून संपूर्ण अहवालाची गरज व्यक्त करून एम.आय.डि.सी.पोलीस स्टेशन, सोलापूर यांना तपास करून आठ दिवसांत त्यांचा अहवाल मे.कोर्टात सादर करण्याचा आदेश पारित केला होता.

त्याप्रमाणे पोलिसांनी तपास करून फिर्यादी महिलेचे गाड्या, सोने व प्लाँटजागा हे आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतल्याची कथित घटना तसेच फिर्यादीचे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची कथित घटना ही परळी, बीड येथे घडल्याने एम.आय.डि.सी.पोलिसांना या घटनेचा तपास करण्याचा अधिकार नसल्याने फिर्यादीचा तक्रारी अर्ज निकाली काढल्याचा अहवाल मे.कोर्टात दाखल केला होता.

यात सुशील कराड तर्फे अँड. संतोष न्हावकर यांनी लेखी म्हणणे दाखल केले होते व त्यासोबत बीड पोलिसांनी केलेल्या तपासाची कागदपत्रे दाखल केली होती व आरोपीतर्फे मुद्दे मांडताना पोलिसांनी दाखल केलेल्या तपासी अहवालासोबत फिर्यादीचा घेतलेल्या जबाब दाखल केला असून त्यामध्ये फिर्यादीने पोक्सोच्या घटनेबाबत व सोलापूर मध्ये घडलेल्या कथीत घटनेचा उल्लेख केला नसल्याने या न्यायालयाचे अधिकारक्षेत्रात प्रस्तुत गुन्हा येत नाही असे मे. कोर्टाचे निदर्शनास आणून दिले होते .

सदर मुद्दे ग्राह्य माणून अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.जे.जे.मोहिते यांनी फिर्यादीची खाजगी फिर्याद फेटाळून लावली व तिने योग्य अधिकारक्षेत्रात दाद मागावी असे आदेश दिले. यात आरोपीतर्फे अँड.संतोष न्हावकर,अँड.राहुल रुपनर,अँड.शैलेश पोटफोडे यांनी तर फिर्यादीतर्फे अँड.विनोद सुर्यवंशी यांनी काम पाहिले.

Tags: Solapur district courtValmik karad
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर भीम सैनिकांचा जल्लोष अन् प्रशासकीय अधिकाऱ्यांचा झाला सत्कार

Next Post

दिलीप स्वामी यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार ; विधानसभा निवडणुकीत या कामाबद्दल होतोय गौरव

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000639
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group