सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वातील परिवर्तन पॅनलचे 15 उमेदवार जाहीर ; भाजपच्या पॅनल मध्ये आहेत हे उमेदवार
सोलापूर : ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे, त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे या भूमिकेतून भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उडी घेतली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी आपण पॅनल उभे करणार असल्याचे सांगितले होते परंतु त्यांच्या या पॅनलमध्ये काँग्रेसच्या एका नेत्याचा समावेश झाल्याने चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
बाजार समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल आणि सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल असे दोन पॅनल झाल्याने आता ही निवडणूक रंगणार आहे. दोन्ही पॅनलचे नाव जरी सिद्धेश्वर असले तरी ही निवडणूक सुभाष देशमुख विरोधात सर्वपक्षीय आघाडी असेच होणार असल्याचे चित्र तयार झाले आहे. परिवर्तन पॅनल मध्ये युवा नेते मनीष देशमुख हा युवा चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेतोय.
विधानसभा निवडणुकीवळी सुभाष देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध करणारे माजी संचालक आप्पासाहेब पाटील हे सुद्धा आता सुभाष देशमुख यांच्या पॅनलमध्ये सहभागी झाले आहेत.
सुभाष देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी पॅनल उभे केले तर आपण त्यांना पाठिंबा देऊ अशी भूमिका आमदार विजयकुमार देशमुख यांनी मांडली होती त्यामुळेही या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. सुभाष देशमुख हे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी चहासाठी जाणार आहेत त्यामुळे या दोन्ही देशमुख नेत्यांच्या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागले आहेत.
दरम्यान श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलचे हे आहेत खालील उमेदवार