सोलापुरात दोन देशमुख आमदारांची चाय पे चर्चा ; कल्याणशेट्टींना निरोप देण्याची वेळ संपली !
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार सुभाष देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा स्वतंत्र पॅनल उभा केल्यानंतर त्यांनी सायंकाळी पाच वाजता दुसरे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या काळजापूर मारुती जवळील श्री सिद्धरामेश्वर लीला या निवासस्थानी आमदार देशमुख भेट घेतली.
विजयकुमार देशमुख यांनी त्यांचे दारातच बुके देऊन स्वागत केले. या दोन्ही आमदार देशमुखांमध्ये बराच वेळ बाजार समिती निवडणुकीच्या अनुषंगाने बराच वेळ चाय पे चर्चा झाली.
डॉक्टर चंद्रगोंडा हवीनाळे, हनुमंत कुलकर्णी, यतीन शहा, भीमाशंकर बबलेश्वर, राम जाधव, सर्जेराव पाटील, अमोल बिराजदार, संग्राम पाटील, राजू काकडे, विशाल जाधव हे उपस्थित होते.
विजय देशमुख म्हणाले, आता ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते आणि पक्ष संघटन वाढीसाठी महत्त्वाची असल्याने त्यांना ताकद देण्यासाठी मी आमदार सुभाष देशमुख यांच्यासोबत आहे.
सुभाष देशमुख म्हणाले, बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे फायनल उभे असून आता आमच्या सोबत विजय देशमुख यांचीही ताकद आहे. सचिन कल्याणशेट्टी हे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले असे समजते परंतु आम्हाला तसा काही निरोप नाही, आणि कल्याणशेट्टी यांना निरोप देण्याची वेळ संपली अन् मिडिया मार्फत निरोप देण्याची इच्छा नाही.