सुभाष देशमुखांना सोडून कुणालाही उमेदवारी द्या ; नाराज गट भेटला फडणवीसांना; तिथे काय घडले
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात त्यांचे नगरसेवक कार्यकर्ते बंडाचे निशाण फडकावत आहेत. सहा ते सात माजी नगरसेवकांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला असून हे सर्व गुरुवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थाने भेटीला गेले होते.
माजी सभागृह नेता श्रीनिवास करली, माजी नगरसेविक अशोक बिराजदार पाटील, श्रीनिवास बुरुड, माजी नगरसेवक वैभव हत्तुरे, माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, अनिल चव्हाण, इच्छुक उमेदवार मळसिद्ध मुगळे, सचिन चव्हाण, श्रीशेल मामा हत्तुरे, आप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सागर बंगला येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली. फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. पण मी फडणवीस यांनी रतन टाटा यांचे निधन झाल्यामुळे पुढच्या आठवड्याची भेटीची वेळ दिली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा मुंबई येथे आगमन झाल्या कारणाने आजची भेट रद्द करण्यात आली व पुढील आठवड्याची वेळ देण्यात आली आहे.
दक्षिण सोलापूर मध्ये उमेदवार बदलासाठी आम्ही सामूहिकरीत्या भेट घेतली आहे असे सांगण्यात आले. तेव्हा तुमची पुढील आठवड्यात बैठक घेऊ असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे.