सोलापूर रेस्ट हाऊस मे इतना सन्नाटा क्यू है भाई….!
सोलापूर : सात रस्ता चौकातील शासकीय विश्रामगृह कायम वर्दळीचे ठिकाण. इथे राजकीय नेते, कार्यकर्ते तसेच प्रशासकीय अधिकारी, पोलीस यांची रेलचेल पाहायला मिळते.
गुरुवारी शासकीय विश्रामगृहाचे चित्र पाहिले असता सन्नाटा पाहायला मिळाला. या ठिकाणी एकही कर्मचारी कामावर नसल्याचे समजले. त्यामुळे येथे राहत असलेल्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती घेतली असता समजले की शासकीय विश्रामगृहात कर्मचाऱ्यांच्या ठेकेदाराचे कॉन्ट्रॅक्ट मुदत संपली असल्याने त्याला काम बंद ठेवायला सांगितले आहे. त्यामुळे गुरुवारी एकही कर्मचारी कामावर आला नाही.
संबंधित कॉन्ट्रॅक्टरचा मक्ता काही महिन्यांपूर्वी संपला होता परंतु त्याला काही दिवस मुदतवाढ देण्यात आली त्यामुळे त्याची बिले पेंडिंग राहिली होती. सोलापुरात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांचे दौरे असल्याने काही दिवस ऍडजेस्ट करण्यात आले होते.