तुळजापुरात व्यक्तिमत्व विकास शिबिर ; युवा पिढीसाठी काय आहे हा उपक्रम
भविष्यातील युवा पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर 2025 हे तुळजापुरातील पंचरंग प्रतिष्ठान घेत आहे.
या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तुषार भद्रे सातारा (अभिनेते, नाट्यदिग्दर्शक,लेखक) संदीप पाठक (प्रख्यात नाट्य सिनेअभिनेता ) आणि प्रा. डॉ. संजय पाटील- देवळाणकर (विभाग प्रमुख नाट्यशास्त्र, के एस के महाविद्यालय बीड तथा परीनिरीक्षण मंडळ सदस्य महाराष्ट्र शासन,मुंबई) लाभलेले आहेत.
सदर व्यक्तिमत्व विकास शिबिर हे तुळजापूर येथील हॉटेल स्कायलँड तुळजापूर वातानुकूलित सभागृहामध्ये दिनांक 21 मे 2025 ते 24 मे 2025 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये प्रवेशाची मर्यादा केवळ 75 जागा इतकी आहे.
हे व्यक्तिमत्व विकास शिबिर यशस्वी करण्यासाठी समन्वयक प्रशांत शेटे, ऍड. दत्तात्रय घोडके,प्रा. डॉ.शिवाजी जेटीथोर,ऍड.अक्षय जाधव हे प्रयत्न करीत आहेत.
पंचरंग प्रतिष्ठान हे तुळजापूर शहरातील सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीतील प्रतिक गेल्या अनेक वर्षापासून आहे. पंचरंग प्रतिष्ठान ही संस्था धाराशिव जिल्ह्यातील सांस्कृतिक जडणघडण आणि युवा पिढींच्या विकासासाठी अथक कार्यरत आहे.
श्रीकांत (आप्पा) नाडापुडे यांच्यासह पाच रंगकर्मी यांनी स्थापन केलेल्या, या संस्थेने नाट्य स्पर्धा,एकांकिका स्पर्धा, एकांकिका महोत्सव आणि युवक महोत्सवाद्वारे महाराष्ट्रभर आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. दिलीप भोसले (दिग्दर्शक) खाजाभाई सय्यद, मुंबई (डिझाईन) प्रा.संभाजी भोसले(समन्वयक युवा महोत्सव),उमेश जगताप (अभिनय) योगेश राऊत (लेखन दिग्दर्शन) शंतनू गंगणे (अभिनय,निर्माता) यासारखे कलाकार आज चित्रपट नाट्य आणि टीव्ही क्षेत्रात यशस्वी रित्या कार्यरत आहेत. ही पंचरंग प्रतिष्ठानची यशोगाथा आहे.
आजच्या तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या युगात पंचरंग प्रतिष्ठान तुळजापूर ,परिसरातील युवा पिढीला व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून प्रेरणा देण्यासाठी पुढाकार घेत आहे. या उद्देशाने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर पंचरंग प्रतिष्ठान आयोजित करीत आहे.
. याच उद्देशाने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर पंचरंग प्रतिष्ठान आयोजित करत आहे.
या शिबिराची वैशिष्ट्ये शिबिरामध्ये पाचवी ते दहावी या विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य आणि आवाजाची जोपासना, आत्मविश्वासाने बोलण्याची कला,सामाजिक संवाद आणि नेतृत्व,समाजात प्रभावीपणे वापरायचे धडे, वैयक्तिक विकास यामध्ये शालेय अभ्यास ह्या पलीकडे जीवन कौशल्याचा विकास याबाबत मार्गदर्शन होणार आहे.