सोलापूर जिल्हा परिषदेत झाली अभियंत्यांची परीक्षा ; कुलकर्णी यांचा काय होता हा अभिनव प्रयोग
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या अभिनव कामकाज करण्याच्या पद्धतीवरून प्रेरणा घेऊन जिल्हा परिषदेत एक आगळीवेगळी परीक्षा घेण्यात आली.
जिल्हा परिषद बांधकाम विभाग २ अंतर्गत नुकत्याच रुजू झालेल्या कनिष्ठ अभियंता यांना नियमानुसार मोजमाप पुस्तिकेचे अधिकार द्यावयाचे होते व तशी मागणी उपविभागाकडून करण्यात आली होती त्या अनुषंगाने करमाळा, माळशिरस, मंगळवेढा, पंढरपूर व सांगोला येथील कनिष्ठ अभियंत्यांना दिनांक २० मे २०२५ रोजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक २ यांच्या कार्यालयात बोलवून घेतले होते व त्यांचीअचानक लेखी वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा घेण्यात आली.
लेखी परीक्षेचे स्वरूप हे मोजमाप पुस्तिकेच्या अनुषंगाने कनिष्ठ अभियंता यांना असलेल्या ज्ञानाबाबत होते. या परीक्षेला एकूण १३ कनिष्ठ अभियंते हजर होते व सर्वच्या सर्व जणांनी लेखी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. त्यामुळे या उत्तीर्ण कनिष्ठ अभियंता मोजमाप पुस्तिका लिहिण्याचा अधिकार कनिष्ठ अभियंत्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे देण्यात आला.
अशा प्रकारची अचानक व अभिनव परीक्षा घेण्याची जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही बहुधा पहिली वेळ असावी. ज्या कनिष्ठ अभियंत्यांची सेवा दोन वर्ष किंवा त्यापेक्षा कमी झालेली असेल अशा अभियंत्यांच्या ज्ञानाची चाचणी करण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांना आहेत व त्याचाच वापर करून कनिष्ठ अभियंत्यांची ही प्रथम चाचपणी करण्यात आली व त्यात परीक्षेत हजर असणाऱ्या सर्व कनिष्ठ अभियंत्यांनी यश मिळवले.
परीक्षेचे स्वरूप हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी परीक्षेतील वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांवर आधारित होते.
ही परीक्षा पार पाडण्यासाठी विठ्ठल मलपे, परशुराम बिराजदार तसेच चेतन भोसले यांनी तसेच बांधकाम विभाग दोन मधील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
अशा स्वरूपाची परीक्षा घेतल्याबद्दल संबंधित कनिष्ठ अभियंता यांनी आश्चर्य व्यक्त केले तसेच आपल्या ज्ञानाचा उपयोग दैनंदिन कामकाजात करता येतो याची प्रचिती घेतली.
माननीय कार्यकारी अभियंता श्री.कुलकर्णी साहेब आज आपल्याकडून आम्ही सरळसेवेतून जॉईन झालेलो कनिष्ठ अभियंता यांना घेण्यात आलेली मोजमाप नोंदविण्याचे अधिकार प्रदान करण्याबाबतची प्रकिया अतिशय पारदर्शक व निष्पक्ष वाटली व झालेल्या पेपर मधून आणि नंतर तुमच्याकडून भेटलेले मार्गदर्शन यातून आम्हाला पुढील कामकाजासाठी निश्चितच खूप मदत होईल.
शशांक गवसणे
(कनिष्ठ अभियंता)
जि प बांध. उपविभाग करमाळा
मा. कार्यकारी अभियंता श्री. संतोष कुलकर्णी सर यांनी आज जिल्हा परिषद सोलापूर येथे नव्याने रुजू झालेल्या 13 कनिष्ठ अभियंत्यांना मोजमाप पुस्तिकेत मोजमाप नोंदविण्याचे अधिकार प्रदान केले, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
स्वतः पेपर सेट करून त्यांनी घेतलेली परीक्षा ही खरंच दर्जेदार आणि कसोटी पाहणारी होती. परीक्षेनंतर त्यांनी स्वतः सर्व पेपरचे सखोल विश्लेषण करून आम्हा सर्वांना महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले, ज्यामुळे आमच्या तांत्रिक संकल्पना अधिक स्पष्ट होण्यास मदत झाली.
त्यांनी मार्गदर्शनपर सूचना दिल्या, आपल्या अनुभवांची शिदोरी आमच्यासोबत शेअर केली आणि आपल्या रानातील खास आंबे देऊन आपुलकीचं नातं जपलं.
अतिशय व्यस्त दिनक्रमातही वेळ काढून त्यांनी घेतलेला हा प्रेरणादायी उपक्रम आमच्यासाठी नक्कीच स्मरणीय आणि मार्गदर्शक ठरणारा आहे.
– श्रीधर नामदस,
कनिष्ठ अभियंता, मुख्यालय, जिल्हा परिषद सोलापूर
मोजमाप नोंदवही मध्ये मोजमाप नोंदवण्याचे अधिकार साठी माननीय कार्यकारी अभियंता कुलकर्णी साहेब यांनी वस्तुनिष्ठ प्रश्नांची चाचणी परीक्षा घेऊन व गुणवत्ता तपासून उत्तीर्ण झालेल्या कनिष्ठ अभियंता यांना मोजमाप नोंदवण्याचे अधिकार प्रदान केले.
प्रश्नाची काठीण्यता पातळी व दर्जा खरोखरचं कसोटी घेणारी होती.
परीक्षा झाल्यावर चुका व स्पष्टीकरण उत्तमरीत्या समजावून सांगितले.
MB लिहिताना होणाऱ्या संभाव्य चुकांबद्दल ही मार्गदर्शन केले व प्रशासनामध्ये काम करताना आलेल्या अनुभव ही आमच्या सोबत share केला.
हे चर्चा सत्र आम्हाला सकारात्मक ऊर्जा देणारे होते.
खूप खूप धन्यवाद साहेब ..🙏
वैभव फरताडे
(कनिष्ठ अभियंता)
जि. प. बांध. उपविभाग, करमाळा