सोलापुरात रिपाइं आठवले गट आक्रमक ; या मागण्यांकडे वेधले शासनाचे लक्ष
सोलापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने सोलापुरात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोटरसायकल रॅली काढून जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर धरणे आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार अतिक्रमण मुक्त करण्यात यावे, बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949 चा व्यवस्थापन अॅक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे, बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती
आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात, या मागण्या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
प्रदेश उपाध्यक्ष के डी कांबळे, शहराध्यक्ष अतुल नागटिळक, राजेश उबाळे, रवी गायकवाड, श्याम धुरी, अविनाश मडीखांबे, लक्ष्मण रणदिवे, सुग्रीव जेटीथोर, अरुण भालेराव, सुशील सरवदे, शिवम सोनकांबळे, राजा दावणे, शिवानंद उबाळे, पवन थोरात, समीर नदाफ यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.