आई पाकणी मार्गे घरी येतो, नंतर फोन स्विच ऑफ, प्रशांत काही आलाच नाही
सोलापूर : सोलापूर शहर जिल्ह्यातून युवती, विवाहित महिला, युवक बेपत्ता होण्याचे प्रमाण कमी झालेले नाही, आता तर विवाहिता आपल्या मुलांसह घरून निघून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मोहोळ तालुक्यातील तेहतीस वर्षाचा युवक आईला फोन करून घरी येतो म्हणून सांगितले पण तो घरी गेलाच नाही. तो बेपत्ता झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आवाहन केले आहे.
हेमंत देवबा थोरात राहणार कॅनल नं.05, मु.पो. विरवडे (बु) तालुका मोहोळ सोलापूर यांचा मुलगा नामे प्रशांत हेमंत थोरात वय-38 वर्षे हा दिनांक 12/03/2025 रोजी 19 वाजण्याचे सुमारास भागवत टॉकीज येथून आईला फोन करून पाकणी मार्गे घरी येतो असे सांगितले. त्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ लागत असून तो राहते घरी अद्यापपर्यंत परत आला नाही. नातेवाईकांकडे व मित्रांकडे चौकशी केली परंतु मिळून न आल्याने फौजदार चावडी पोलीस ठाणेस 14 मार्च रोजी बेपत्ता दाखल करण्यात आले आहे.