सोलापुरात ‘समांतर’ वरून भाजपच्याच दोन आमदारांमध्ये ‘ मत-मतांतर ‘
सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात आली या बैठकीत ग्रामीण परीक्षा सोलापूर शहरातील विविध प्रश्नांवर सर्वाधिक चर्चा झाली. त्यामध्ये ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख व युवा आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रश्न उपस्थित केले.
आमदार सुभाष देशमुख यांनी सुरुवातीलाच समांतर जलवाहिनीचा प्रश्न उपस्थित करत जलवाहिनी झाली परंतु पाणी कुठे साठवणार असा प्रश्न केला तसेच शहरात 28 पाणीपुरवठाच्या योजनांना शासनाने मंजुरी दिली आहे परंतु दहा महिने होत आले त्या कामाची प्रमा नाही कोणतीही वर्क ऑर्डर नाही असे प्रश्न उपस्थित करत महापालिकेला धारेवर धरले.
सुभाष देशमुख यांचा रोष पाहता पालकमंत्री गोरे यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि नगर अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याच्या सूचना जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.
एकीकडे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख महापालिकेला धारेवर धरीत असताना दुसरीकडे युवा आमदार देवेंद्र कोठे यांनी मात्र समांतर जलवाहिनी पूर्ण झाल्याबद्दल आणि या जलवाहिनीच्या पाणी साठवण्यासाठी पाकणी हाऊस या ठिकाणी असलेल्या वन विभागाच्या जमिनीचा प्रश्न पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून सुटल्या बद्दल त्यांच्या अभिनंदनचा ठराव केला.
तसेच महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे समांतर जलवाहिनीचे काम जलदगतीने झाले त्याबद्दल अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
एकीकडे सुभाष देशमुख महापालिकेच्या कारभारावर नाराज व्यक्त करत असताना दुसरीकडे देवेंद्र कोठे यांनी कौतुक केल्याचे पाहत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एकदा कोठे यांच्याकडे आणि दुसऱ्यांदा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पहात गालात हास्य केले.