महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या प्रलंबित कामांसाठी पालकमंत्र्याकडे पाठपुरावा करणार – रोहिणी तडवळकर
भारतीय जनता पार्टीच्या नूतन शहराध्यक्ष रोहिणी ताई तडवळकर यांची सोलापूर शहर अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आज श्री बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराच्या वतीने कौतम चौक येथील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून तसेच नगरसेवक जगदीश पाटील व बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 25 लाख रुपये निधीतून बसव कल्याण येथील महात्मा बसवेश्वर पुतळा परिसराच्या धर्तीवर बांधलेल्या प्रभावळचे रोहिणी ताई तडवळकर यांच्या शुभहस्ते पूजन करून लोकार्पण करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना रोहिणी ताई म्हणाले की महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या प्रलंबित कामांसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबाना आपल्या शिष्टमंडळाला घेऊन पुढील दौऱ्यात भेटून राहिलेली कामे करून देण्याचे आश्वासन देत,हा परिसर माझ्या जुन्या वार्डातील असल्याने याचे काम पूर्णत्वास नेणे हे माझे कर्तव्य असल्याचे त्यांनी मनोगतात सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन बसवेश्वर सर्कलचे गुरुराज पदमगोंडा यांनी केले सूत्रसंचालन सागर अतनुरे यांनी व आभार रंजिता चाकोते यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक जगदीश पाटील, चन्नवीर चिट्टे, रंजिता चाकोते,संजय होमकर,भिमाशंकर पदमगोंडा, गणेश चिंचोळी,सागर अतनुरे,अक्षय अंजिखाने, गुरुराज पदमगोंडा,आशिष दुलंगे,विजय कुलथे,भैय्या कुर्ले,बाळासाहेब वाघमोडे,शेखर फंड,विनोद गाडगे,संपदा जोशी,मनोज कलशेट्टी,रोहित बिद्री,ओंकार होमकर,रोहित दहीटणे, साई सज्जे,ऋतुराज वाघमोडे आदी उपस्थित होते.