“शाब्दी शेठ, बल्ल्या हो गया, देवेंद्र कोठे आमदार हो गया” : काँग्रेसचा उमेदवार चुकला ; आडम यांचे पुन्हा डिपॉझिट जप्त
सोलापूर : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सोलापूर शहर मध्य या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळ पहिल्यांदाच फुलले आहे. या ठिकाणी प्रथमच उमेदवारी मिळालेले देवेंद्र कोठे हे आमदार झाले आहेत. त्यांनी एमआयएमचे फारूक शाब्दि, काँग्रेसचे चेतन नरोटे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आडम मास्तर यांचा पराभव केला. प्रणिती शिंदे यांनी सोडलेला मतदार संघ आता भाजपने काबीज केला आहे.
चौथ्या राऊंड पासून मताधिक्य घेतलेले देवेंद्र कोठे यांचे लीड वाढत गेली त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बालेकिल्याला सुरू लावलेल्या देवेंद्र कोठे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी दिली. फडणवीसांचा विश्वास सार्थ ठेवत काँग्रेसच्या बालेकिल्लाला सुरुंग लावत दणदणीत विजय मिळवला आहे.
भारतीय जनता पार्टीने अतिशय शांततेत हे मतदार संघ हाताळला. बंडखोरांना मागे घेण्यास शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांची यशस्वी भूमिका दिसून आली तसेच काँग्रेसवर नाराज असलेला मोची समाजाला आपल्याकडे वळवण्यात ज्येष्ठ नेते शहाजी पवार आणि अविनाश महागावकर यांचा रोल महत्त्वाचा राहिला. या निवडणुकीत भाजपने कुठेही हिंदुत्वात पुढे आणला नाही. सर्व समाजाची मते मिळवायची हा ध्येय समोर ठेवून देवेंद्र कोठे यांनी आपली प्रचार यंत्रणा राबवली.
माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सुद्धा आपल्या मित्राला साथ देताना अनेक गाठीभेटी घडवून आणत वातावरण सकारात्मक केले.
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र कोठे यांच्यासोबत पद्मशाली समाज, लोधी समाज, ब्राह्मण समाज, बेडर समाज, मोची समाज, आंबेडकर समाज, भटका विमुक्त समाज आणि काही प्रमाणात चांगले रिलेशन असल्याने मुस्लिम समाजाने सुद्धा मतदान केल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र कोठे यांचा हा विजय म्हणजे हिंदुत्ववादाचा नसून सर्व समाजाच्या नागरिकांनी केलेल्या मतदानाचा विजय म्हणावा लागेल.
काँग्रेस पक्षाकडून सुरुवातीला ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या नावाची चर्चा होती. त्यांना उमेदवारी मिळेल अशी ही शक्यता होती परंतु बाबा मिस्त्री यांनी नकार दिला आणि शेवटच्या क्षणी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या गळ्यात बळजबरीने उमेदवारीची माळ घालावी लागली. त्याचा फटका काँग्रेसला बसला. नाराज असलेला मोची समाज, मुस्लिम समाज दुसरीकडे वळाला.
ज्येष्ठ नेते आडम मास्तर हे आता चौथ्यांदा पराभूत झाले आहेत. सलग तीन वेळा त्यांचे डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की त्यांच्यावर आली.
“ताई के बाद भाई” असे घोषवाक्य घेऊन मैदानात उतरलेल्या एमआयएमच्या फारुक शाब्दि या पराभवाने मोठी अडचण झाली आहे. मुस्लिम समाज वगळता इतर समाजाची मते वळवण्यात ते अपेक्षित ठरल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रणिती शिंदे यांना सपोर्ट केल्यानंतर यंदा ते आमदार होतील अशी शक्यता होती पण लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाने मतदान केले त्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत मतदान दिसून आले नाही याचा फटका असे म्हणावे लागेल.