जिल्हा परिषद सीईओ यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने ; कुलदीप जंगम यांनी दहा मिनिटात आंदोलकांना केले शांत
सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या कार्यालयाबाहेर काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सर्वांना जंगम यांनी आपल्या कार्यालयात बोलावून दहा मिनिटात त्यांच्या विषयावर तोडगा काढल्याचे पाहायला मिळाले.
सोलापूर जिल्हा परिषद मधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातील कारभारा विरोधात सोलापुरात सर्वपक्षीय सोलापूर जिल्हा विकास मंचच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या दालनाबाहेर आंदोलन करून चर्चा करण्यात आली.
यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप या दोघांविरोधात ही तक्रार होती. यावेळी साथी बशीर अहमद, विष्णू कारमपुरी, अर्जुन सलगर आदीसह इतर पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
जंगम यांना भेटल्यानंतर साठी बशीर अहमद यांनी माध्यमांना माहिती देताना येत्या दहा दिवसात या विषयांवर तोडगा काढण्याची आश्वासन दिले असल्याचे सांगितले.