सोलापूरच्या लता ढेरे दादांच्या राष्ट्रवादीतून साहेबांच्या राष्ट्रवादीत परतल्या
सोलापूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. अजित पवार हे सत्तेमध्ये गेल्याने त्यांच्याकडे जाण्याचा कल वाढला परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडे कार्यकर्ते परत असताना दिसत आहेत.
पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महिला कार्याध्यक्ष लता ढेरे यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश करून त्या पक्षातून महिला प्रदेश सरचिटणीस पद मिळवले, पण त्या आता पुन्हा स्वगृही परतल्या आहेत.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशच्या नेत्या नलिनी चंदेले यांच्या उपस्थितीत त्यांनी हातातील घड्याळ काढून तुतारी हातात घेतली. यावेळी महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील गटबाजीला वैतागून त्यांनी पक्ष सोडला असल्याचे सांगण्यात येत आहे.