सुभाष देशमुख यांचा संभाव्य उमेदवार धर्मराज काडादी यांना शह ; ग्रामदैवत सिध्दरामेश्वरांचा आशीर्वाद माझ्याच पाठीशी राहणार
सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे 99 उमेदवारांची यादी रविवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सोलापुरात दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे. बापूंना उमेदवारी मिळाल्याने समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दक्षिण सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीतून धर्मराज काडादी यांना संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते. त्यांच्या नावाची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
उमेदवारी जाहीर होऊन दुसऱ्या दिवशी सुभाष देशमुख यांनी काडादी यांना शह दिला आहे. त्यांनी धर्मराज काडादी हे देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष असलेल्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्या ठिकाणी त्यांनी आरती केली.
माध्यमांशी बोलताना मागील दहा वर्षात आपण जनतेच्या विश्वासास पात्र ठरलो आहोत. अनेक विकास कामे केले आहेत. त्यामुळेच पक्षाने आपणावर विश्वास ठेवून तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असे सांगताना ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांचा आशीर्वाद आपल्याच पाठीशी राहणार असे सांगून काडादी यांना नकळत टोला हाणला आहे.