सोलापूरच्या चंदनशिवे यांनी समाजाला दिली ‘आनंदा’ची बातमी ; याचे मिळाले नाहरकत प्रमाणपत्र
मुंबई : सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सम्राट चौक परिसरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे माता रमाई आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे साठी शहरातील सर्व आंबेडकर अनुयायी,विविध सामाजिक संघटना, व राजकीय पक्ष यांची माता रमाई पुतळा बसविण्या संदर्भात मागणी होती.
त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या पुढाकारातून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र.पुतळा ३१४६/ प्र. क्र. ३०८/२९ दिनांक ०२/०५/२०१७ शासन निर्णय पारित झाला आहे. त्यानुसार सोलापूर महानगरपालिका सर्वसाधारण सभा विषय क्रमांक ०६ प्रशासन ठराव दिनांक १३/०६/२०२४च्या अनुषंगाने मुख्य वास्तुशास्त्रज्ञ महाराष्ट्र यांना नगर अभियंता बांधकाम विभाग यांच्याकडून माता रमाई यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत चबुतत्र्याच्या आराखड्यास मान्यता देण्याकरिता पत्र सादर करण्यात आले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित विभागास सदर प्रकरणी सहकार्य करण्याकरता सूचना केल्या.
त्यानुसार आज मुंबई येथील बांधकाम भवन या ठिकाणी मुख्य वास्तुशास्त्रज्ञ चेतन आक्रे, उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ श्रीमती अंजली मातोडकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांना ना हरकत प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.
पुढील कार्यवाहीस्तव सदर ना हरकत प्रमाणपत्र मा.जिल्हाधिकारी सोलापूर व सोलापूर महापालिका आयुक्त यांना पाठविण्यात आले.
सदर पुतळा उभारण्या कामी सर्व परवानगी, ठराव ,जागा मालकी हक्काबाबतचे मालमत्ता पत्र, प्रमाणपत्र ,प्रतिज्ञापत्र, शपथपत्रासह सर्व कार्यालयीन कामकाजाकरिता सोलापूर महानगरपालिका आयुक्त शितल तेली उगले , अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकुलवार, उप अभियंता किशोर सातपुते, उप अभियंता अविनाश वाघमारे, सहाय्यक अभियंता प्रशांत गुंड ,आर्किटेक्ट महेश पाटील, महेश केसकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
ना हरकत प्रमाणपत्र घेतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, मा.नगरसेवक गणेश पुजारी,उप अभियंता अविनाश वाघमारे , सहाय्यक अभियंता प्रशांत गुंड ,धीरज वाघमोडे उपस्थित होते.