Wednesday, June 25, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या शासकिय विभागांना या सूचना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 December 2024
in Administration
0
सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या शासकिय विभागांना या सूचना
0
SHARES
4.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या शासकिय विभागांना या सूचना

सोलापूर (जिमाका):- जिल्ह्यात 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा केला जात आहे, याच अनुषंगाने सर्व शासकीय विभागांनी व त्यांच्या अधिनस्त सर्व कार्यालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी तसेच आपले पोर्टल सरकारवर येणाऱ्या विविध तक्रारींचा त्वरित निपटारा करावा. आणि सर्व शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यापर्यंत अत्यंत गतिमान पद्धतीने पोहोचवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

देशाचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनेप्रमाणे 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत जिल्हास्तरावर सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सुशासन कार्यशाळेत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, एडवोकेट जगदीश धायतिडक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व जिल्हास्तरीय अधिकारी तहसीलदार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, शासनाने सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात न येता त्यांच्या तक्रारी त्यांना योग्य पद्धतीने करता येतील व त्याचा वेळेत निपटारा होऊन त्यांना समाधान मिळेल व गतिमान पद्धतीने शासनाचे काम होईल याकरता आपले सरकार पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांनी आपले सरकार पोर्टलवर आलेल्या सर्व प्रकारच्या तक्रारींची अत्यंत गांभीर्यपूर्वक दखल घेऊन त्याचा वेळेपूर्वी निपटारा करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

त्याप्रमाणेच प्रत्येक तहसील कार्यालयामार्फत एक क्यूआर(QR) कोड तयार करावा. व हा कोड त्या तहसील कार्यालयातील प्रत्येक गावापर्यंत व नागरिकांपर्यंत पोहोचल याची काळजी घ्यावी. हा क्यू आर कोड स्कॅन करून त्या तहसील कार्यालय व तालुकास्तरीय यंत्रणाबाबत नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी नागरिकांमार्फत केल्या जातील व त्याचा निपटारा तालुकास्तरीय प्रशासकीय यंत्रणेने त्वरित करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासकीय योजनेचा लाभ मिळत आहे की नाही याबाबत खात्री करण्यासाठी एका एजन्सी मार्फत दररोज किमान 1 ते 2 हजार नागरिकांना फोन कॉल करण्यात येतील व त्यांना मिळणाऱ्या योजनेविषयी माहिती घेतली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर यांनी सुशासनाचे महत्त्व सांगून प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात आलेल्या तक्रारींच्या वेळेत निपटारा होण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना केली. तसेच आजच्या जिल्हास्तरीय सुशासन सत्ता कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक एडवोकेट धायतिडक यांनी महसूल प्रशासनातील दिवाणी व महसुली कायद्याचे महत्त्व सांगून त्या कायद्याच्या अनुषंगाने कशा पद्धतीने कोणत्या कलमाखाली कार्यवाही करावयाची याची अत्यंत बारकाईने माहिती दिली.
यावेळी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते सन्मानपत्र वितरित करण्यात आले.

प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सुशासन सप्ताह निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली तसेच आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. तर या कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी मानले.

Tags: Collector kumar ashirwadसुशासन सप्ताह
SendShareTweetSend
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आमच्यासाठी देव ! सोलापुरात राष्ट्रवादीने अमित शहा यांच्या चेहऱ्याला…..

Next Post

सोलापूरचा पालकमंत्री कोण? प्रशासन सुद्धा वाट पाहू लागले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरचा पालकमंत्री कोण? प्रशासन सुद्धा वाट पाहू लागले

सोलापूरचा पालकमंत्री कोण? प्रशासन सुद्धा वाट पाहू लागले

ताज्या बातम्या

तिकडे भाऊ अन् इकडे दादा, दोघेही स्वच्छतेचे पाईक ; आयुक्त ओंबासे यांच्या मोहिमेत सहभाग

तिकडे भाऊ अन् इकडे दादा, दोघेही स्वच्छतेचे पाईक ; आयुक्त ओंबासे यांच्या मोहिमेत सहभाग

24 June 2025
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ! आषाढी वारी दरम्यान पंढरपूर शहरासह या गावात दारू राहणार बंद

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ! आषाढी वारी दरम्यान पंढरपूर शहरासह या गावात दारू राहणार बंद

24 June 2025
सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

24 June 2025
भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

24 June 2025
उमेश पाटलांनी जिल्हाध्यक्ष पदाची क्रेझ वाढवली !

उमेश पाटलांनी जिल्हाध्यक्ष पदाची क्रेझ वाढवली !

24 June 2025
मला बदनाम करण्याचा हा डाव ; हत्तूरे मामा म्हणाले, मी कायदेशीर कारवाई करेन

मला बदनाम करण्याचा हा डाव ; हत्तूरे मामा म्हणाले, मी कायदेशीर कारवाई करेन

23 June 2025
सोलापूर तुळजापूर महामार्गावर वृक्षारोपण ; सह्याद्री फाउंडेशनचा पुढाकार

सोलापूर तुळजापूर महामार्गावर वृक्षारोपण ; सह्याद्री फाउंडेशनचा पुढाकार

23 June 2025
सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

22 June 2025

क्राईम

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

सोलापूर शहरानंतर आता ग्रामीणला क्राइम ब्रँच PI ; संजय जगताप ठरले दुसरे सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस विभागात स्थानिक गुन्हे...

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना

by प्रशांत कटारे
24 June 2025
0

 भीषण अपघात ! तिघेजण जागीच ठार ; दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री–मुस्ती रोडवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात...

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब

by प्रशांत कटारे
22 June 2025
0

सोलापुरात डीएनए चाचणीने खोटा ठरला बलात्काराचा आरोप ; उलट तपासात उघड झाली ही गंभीर बाब मोहोळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने...

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

by प्रशांत कटारे
19 June 2025
0

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला ! घातपात की काय? सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1777582
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group