Friday, December 12, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ज्योती वाघमारे यांची गर्जना ; मोची समाजाचा आमदार विधानसभेत गेला पाहिजे ; पक्ष विसरून प्रचार करेन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 October 2024
in political
0
ज्योती वाघमारे यांची गर्जना ; मोची समाजाचा आमदार विधानसभेत गेला पाहिजे ; पक्ष विसरून प्रचार करेन

oplus_2

0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ज्योती वाघमारे यांची गर्जना ; मोची समाजाचा आमदार विधानसभेत गेला पाहिजे ; पक्ष विसरून प्रचार करेन

सोलापूर : शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी आयोजित केलेल्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन समारंभास मोची समाजातील सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास निधीतून प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी जांबुमुनी मोची समाजाकरिता सभामंडप व कंपाऊंड वॉल यासाठी वीस लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्या विकास कामाची भूमिपूजन बुधवार 2 ऑक्टोबर रोजी हुडको सोनी नगर येथील जांबमुनी सांस्कृतिक भवन या ठिकाणी मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर संजय हेमगड्डी होते.

oplus_2

कार्यक्रमाला प्रियदर्शन साठे, सरस्वती कासलोलकर, बसवराज म्हेत्रे, नागनाथ कासलोलकर, रतिकांत कमलापुरे, रवि आसादे, प्रा. नरसिंह आसादे, करेप्पा जंगम, सिद्राम कामाठी, शिवराम जगले, मारेप्पा कंपली, कुमार जंगडेकर, नागनाथ वाघमारे यांच्यासह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागेश म्हेत्रे यांनी सूत्रसंचालन केले.

oplus_2

संजय हेमगड्डी म्हणाले, मोची समाजाच्या विकासासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्व एकत्र आलोत हे महत्वाचे आहे. ज्योती वाघमारे यांनी समाजाच्या उन्नतीसाठी निधी आणला तो निश्चित कौतुकास्पद आहे.
अनेक जण नगरसेवक झाले, अनेक पदे भोगली, आता कुणीही कोणत्या पक्षाकडून आमदारकीचे तिकीट आणावे समाज म्हणून पाठीशी उभा राहीन.

देवेंद्र भंडारे म्हणाले, समाजासाठी आनंदाचा दिवस आहे, ज्योती वाघमारे यांनी मोठा निधी दिला, त्याबद्दल कौतुक केले. समाजाचे अनेक प्रश्न आहेत, बाबू जगजीवनराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणे गरज आहे, त्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी वाघमारे यांच्याकडे केली. समाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा एक शक्ती तयार होते, त्यामुळे मोची समाजाचा आदर्श घेण्यासारखे आहे. इथे सर्वपक्षीय आहेत पण राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही एकत्र येतो.

ज्योती वाघमारे म्हणाल्या, समाज माझ्या पाठीशी असल्याचा मला अभिमान आहे. मी जिथे कुठे उभी राहते त्यावेळी माझा समाज माझ्या पाठीशी आहे हे माझे भाग्य समजते. या समाजात जन्माला आले माझे पुण्य आहे, त्यामुळे माझ्या समाजासाठी देणं लागते म्हणून मी प्रयत्न करतेय, राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्रित आलो ही आनंदाची गोष्ट आहे. समाजाच्या शाळेचा प्रश्न लवकरच सुटेल, आचारसंहिता लागायच्या आत मोची समाजासाठी महामंडळ मंजूर होईल हा शब्द देते.
मला भावी आमदार म्हणतात, अनेक जण इतर पक्षा कडून इच्छुक आहेत. मी शिवसेनेकडून उमेदवारी मागितली पण यावेळी काहीही करून मोची समाजाचा आमदार विधानसभेत पाठवायचा आहे, जो पक्ष उमेदवारी देईल मी पक्ष विसरून प्रचार करेन अशी घोषणा केली.

बसवराज म्हेत्रे यांनी ज्योती वाघमारे यांच्या कार्याचे कौतुक केले. महाराष्ट्राच्या त्या प्रवक्त्या झाल्या, त्यांनी समाजाचे नाव उंचावले, समाजासाठी त्यांनी निधी आणला त्याबद्दल कौतुक आणि अभिनंदन केले.

नरसिंह आसादे म्हणाले, समाजात विकासाचा निधी आला पाहिजे यासाठी देवेंद्र भंडारे यांनी प्रयत्न केले, ज्योती वाघमारे यांनी आपल्या भागात एक कोटी 20 लाखाचा विकास निधी दिला त्यांचे विशेष कौतुक करतो. सरकार कडून समाजाला निधी आल्याची पाहिली वेळ असल्याचे सांगितले.

सिद्राम कामाठी यांनी प्रास्ताविक करताना देवेंद्र भंडारे यांच्या कार्याचे कौतुक केले, शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी समाजाच्या विकास कामासाठी निधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

Tags: #Mochi samajDevendra bhandareJyoti WaghmareSanjay hemgaddi
SendShareTweetSend
Previous Post

‘दक्षिण’मध्ये शिवसेनेची मशाल पेटणारच ! अमर पाटील यांचा निर्धार ; गावभेट दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद

Next Post

तुतारी हाती घेण्यासाठी पवारांचा संतोष शरद पवारांच्या भेटीला

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
तुतारी हाती घेण्यासाठी पवारांचा संतोष शरद पवारांच्या भेटीला

तुतारी हाती घेण्यासाठी पवारांचा संतोष शरद पवारांच्या भेटीला

ताज्या बातम्या

सोलापुरात काँग्रेसच्या रियाज हुंडेकरी यांनी प्रभाग बदलला ! सोबत आले दादा

सोलापुरात काँग्रेसच्या रियाज हुंडेकरी यांनी प्रभाग बदलला ! सोबत आले दादा

11 December 2025
खासदार ताई समर्थक ‘सोहेल’वर अजितदादांची छाप ; लवकरच बांधणार घड्याळ

खासदार ताई समर्थक ‘सोहेल’वर अजितदादांची छाप ; लवकरच बांधणार घड्याळ

11 December 2025
सोलापूरमध्ये महाविकास आघाडी एकवटली ! मनसेचा ही सहभाग पण एमआयएम दिसेना

सोलापूरमध्ये महाविकास आघाडी एकवटली ! मनसेचा ही सहभाग पण एमआयएम दिसेना

10 December 2025
सोलापूरच्या  पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे ‘अण्णा द ग्रेट’ ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल

सोलापूरच्या पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे ‘अण्णा द ग्रेट’ ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल

9 December 2025
सोलापूरचा पाणी प्रश्न नागपुरात पेटला ! अण्णांच्या बैठकीत मोहिते पाटील समर्थक डोंगरे आक्रमक

सोलापूरचा पाणी प्रश्न नागपुरात पेटला ! अण्णांच्या बैठकीत मोहिते पाटील समर्थक डोंगरे आक्रमक

9 December 2025
सोलापूरच्या दादा अन् भाऊंची नागपूरमध्ये मार्केटिंग

सोलापूरच्या दादा अन् भाऊंची नागपूरमध्ये मार्केटिंग

8 December 2025
अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराच्या  दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन ; या नेत्यांची उपस्थिती

अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन ; या नेत्यांची उपस्थिती

8 December 2025
सोलापूरच्या देशमुखांची ही कसली एकी; फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठीची युती, कार्यकर्त्यांची मात्र माती

सोलापूरच्या देशमुखांची ही कसली एकी; फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठीची युती, कार्यकर्त्यांची मात्र माती

7 December 2025

क्राईम

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

नर्तिका पुजा गायकवाड हिला जामीन ; गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी नर्तिका पुजा गायकवाड रा....

‘वाँटेड अन् काल्या’ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर !

‘वाँटेड अन् काल्या’ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर !

by प्रशांत कटारे
14 November 2025
0

'वाँटेड अन् काल्या'ला पोलिसांनी हाकलले सोलापूरच्या बाहेर ! सोलापूर शहर पोलिसांनी तडीपारीच्या दोन कारवाया केल्या आहेत. अनेक गुन्हे दाखल असलेल्या...

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच

by प्रशांत कटारे
30 October 2025
0

दक्षिण सोलापूरचा विस्तार अधिकारी अँटीकरप्शनच्या  ताब्यात  ; रस्त्याच्या बिलासाठी घेतली दोन हजाराची लाच   सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Our Visitor

1929323
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group