तुतारी हाती घेण्यासाठी पवारांचा संतोष शरद पवारांच्या भेटीला
दक्षिण सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा शरद पवार यांची मार्ग फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी नुकतेच त्यांच्या मोदी बागेतील निवासस्थानी जावून भेट घेतली. आणि सोलापूर जिल्ह्यातील एकूण राजकीय विषयांवर चर्चा केले तसेच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाकडून संधी दिल्यास लढण्याची तयारीही पवार यांनी त्यांच्याकडे दर्शवली. यामुळे या मतदारसंघातील एकूण जातीय समीकरणाचा इतिहास पाहता बहुजन चेहरा म्हणून खा. पवार यांच्याकडून मद्रेचे पवार तुतारी हाती घेतील का? अशी एक चर्चा मतदारसंघात रंगत आहे.
सध्या हा मतदारसंघ जागावाटपात काँग्रेस पक्षाकडे आहे. मात्र या पक्षाकडून जिल्ह्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या याच मतदारसंघात आहेत. माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापूरे, सिध्देश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, एमके फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनूरे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, माजी सभापती इंदुमती अलगोंड-पाटील असे रतीमहारथी आहेत. ऐनवेळी जागा वाटपातील तडजोड होण्याची शक्यता पाहता हा मतदारसंघ तुतारीला सोडण्याचा निर्णय झालाच तर भुमिपुत्र म्हणून संतोष पवार यांनी खा. पवार यांची खास भेट घेऊन उमेदवारी दिल्यास ताकतीने लढणार असल्याचे अभिवचन त्यांना दिल्याची चर्चा आहे. शिवाय मार्ग फौंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि गरीबांना करण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या सहकार्याविषयीसह अन्य सामाजिक उपक्रमा विषयीची माहिती सविस्तर पणे त्यांना दिलेला आहे. तसेच या मतदारसंघातील विविध गावच्या यात्रा आणि जत्रेतील कुस्ती फडाला हजेरी लावणे आणि जिंकलेल्या मल्लाला चांदीचा गदा भेट देणे आणि या माध्यमातून लोकांमध्ये चर्चेत राहण्याचा त्यांचा आजतागायत प्रयत्न राहिला आहे.
तसेच बहुजन समाजाचा मतदान हे लाखाहून अधिक असल्याचे सांगत त्याची एकत्रित मोट गेल्या अनेक दिवसांपासून बांधल्याची माहिती सुध्दा खासदार पवार यांना देण्यात आला आहे. आणि खासदार यांच्या परिचयातील असलेले बंजारा समाजाचे शिक्षण महर्षी स्व. चंद्राम चव्हाण गुरूजी आणि माजी सभापती स्व. उमाकांत राठोड यांचे सामाजिक कामही मोठा आहे. याचाही आपल्याला फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी त्यांना दिला आहे. बहुजन चेहरा आणि विशिष्ट ध्येय उराशी बाळगून निवडणुक लढविण्याच्या उद्देशाने मी राजकारणात सक्रीय झाल्याचे ते सांगत आहेत. म्हणूनच यंदा दक्षिण सोलापूर मतदारसंघात तुतारी वाजणार असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.