म्हेत्रेंच्या विरोधातील आंदोलनाने काँग्रेसला टेन्शन ; शेतकऱ्यांनी साधला करेक्ट टायमिंग
काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री शुगर साखर कारखान्याला ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सोलापूर शहरातील काँग्रेस भवन समोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. सिद्धाराम म्हेत्रे यांच्या विरोधातील या आंदोलनाने काँग्रेस पक्षाला नवीनच टेन्शन आल्याचे पाहायला मिळत आहेत.
चार सप्टेंबर हा काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस बरोबर याच दिवशी या शेतकऱ्यांनी काँग्रेस भवनाच्या प्रवेशद्वारा समोर बसून आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना सुद्धा आत जाता येत नसल्याचे चित्र आहे.
मातोश्री कारखान्यात ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना सिद्धाराम म्हेत्रे यांनी टनाला 2700 भाव जाहीर केला आहे काही ठराविक शेतकऱ्यांना पाचशे आणि काहीना सातशे प्रमाणे बँकेच्या खात्यात जमा केले आहेत. मागील आठ महिन्यांपासून एक रुपयाही खात्यामध्ये जमा केलेला नाही, थकीत बिल मिळण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.