सिद्धाराम म्हेत्रे विना रंगला सातलिंग शटगार यांचा सेवा निवृत्ती सोहळा
सातलिंग शटगार यांनी शिक्षकी पेशा बरोबर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याच्या माध्यमातून विद्यार्थी पालक व समाजामध्ये जनजागृतीचे व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे काम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. त्यांनी एवढेच नव्हे वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय असून शटगार म्हणजे एक चिंतनशील व्यक्तिमत्व आहे असे प्रतिपादन देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

फडकुले सभागृह सोलापूर येथे शटगार यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी शिंदे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संगमेश्वर कॉलेजचे माजी प्राचार्य नरेश बदनोरे होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माजी गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार विश्वनाथ चाकोते, शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे ,माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी महापौर अलका राठोड, सुशीला आबुटे, संजय हेमगड्डी, पुरुषोत्तम बलदवा, प्राध्यापक भीमाशंकर बिराजदार, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष अशपाक बळोरगी, अक्कलकोटच्या माजी नगराध्यक्ष सुवर्णा मलगोंडा, रवीकिरण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्रीपाद सुरवसे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव, सतीश दरेकर आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे शटगार यांचे मित्र शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांच्या विना हा कार्यक्रम पार पडला याची चर्चा रंगली आहे.
यावेळी प्राचार्य नरेश बदनोरे म्हणाले, सातलिंग शटगार यांनी शिक्षकी पेशा बरोबर समाज जागृतीचे काम केले आहे. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन बरोबर समाजातील वाईट चालीरीती, रूढी, परंपरा,यावर जनजागृतीचे काम केले आहे. तो एक प्रामाणिक निष्ठावंत व सच्चा कार्यकर्ता आहे.आयुष्याच्या शेवटपर्यंत तो समाजसेवेचे काम करेल याची मला खात्री आहे.
याप्रसंगी सातलिंग शटगार यांना शिकवलेल्या गुरुजनांचा सन्मान सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते भेटवास्तु, शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. या सत्कारामध्ये कोंडमाँ बागवान सलगर,ए. एम. घाटगेसर अक्कलकोट, प्राध्यापक नरेश बदनोरे सोलापूर, प्राचार्य के. एम. जमादार सलगर, प्राध्यापक केदारनाथ सुरवसे सोलापूर, श्रीमती छाया पिंपळेकर सोलापूर, विश्वंभर बाबुराव दरेकर सोलापूर, बाबासाहेब कुलकर्णी अधीक्षक ब.ना. बिराजदार वस्तीगृह सोलापूर यांचा सन्मान करण्यात आला. श्री दत्तप्रशाला येथून 35 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त होत असल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते 25 किलोचा पुष्पहार घालून सातलिंग शटगार यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सातलिंग शटगार आपल्या जीवनाचा प्रवास सांगून जीवनाच्या सुख दुःखामध्ये त्यांना मदत केलेल्या सर्व मान्यवरांचे त्यांनी आभार मानले. त्यांनी जिद्द चिकाटी आत्मविश्वास परिश्रम या गोष्टीवर विश्वास ठेवून वाटचाल केल्याचे सांगितले. आणि पुढील आयुष्य देशाचे नेते सन्माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाच्या कार्याला वाहून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार राजश्री तडकासे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक भांजे, डॉ.मंगेश शहा, सोमशेखर भोगडे, विजयकुमार भोगडे, चंद्रकांत सपळे, शिवबाळ मुली, जहांगीर शेख,बाळ दळवी, श्रीदेवी यळमेली, नर्मदा कनकी, रोहित शटगार, माधुरी शटगार ,लक्ष्मीकांत शटगार, शिवशरण शटगार आदींनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन नर्मदा कनकी व श्रीदेवी येळमेली यांनी केले. यावेळी बहुसंख्या शिक्षक शिक्षेतर कर्मचारी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.