सिद्धरामेश्र्वरांचे आशीर्वाद घेत झेडपी सीईओ कुलदीप जंगम झाले जॉईन
सोलापूर : मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची बदली पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर झाल्यानंतर त्यांच्या जागेवर बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची नियुक्ती शासनाने केली आहे. गुरुवारी नियुक्ती झाली शुक्रवारी लगेच सकाळी साडे दहाच्या सुमारास कुलदीप जंगम यांनी मावळत्या सीईओ आव्हाळे यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या कारभाराच्या चाव्या हाती घेतल्या.
सकाळी जंगम यांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे ठीक दहा वाजता जिल्हा परिषदेमध्ये आगमन झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकांदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, मुख्य लेखा वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांचा सह विभाग प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले.
कार्यालयात आव्हाळे यांच्याकडून पदभार घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.