ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटी अध्यक्षपदी अखलाक दिना (मेंबर) यांची निवड
सोलापूर : जुलूस कमिटीचे वतीने गेल्या ५२ वर्षापासून जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटी सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी अल्लाबक्ष हुसैन दिना ही परंपरा आता पर्यंत चालू आहे. या वर्षी त्यांचे चिरंजीव अखलाक अल्लाबक्ष दिना यांची एकमताने निवड करण्यात आली. वार्षिक सभा अॅड. यु. एन. बेरिया यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ही निवड एकमताने बिनविरोध झाली. तसेच अयाज दिना यांची मिडिया प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
यावेळी विश्वस्त मोहम्मद हनीफ बडेपीर, वाहिद नदाफ, सल्लागार माजी महापौर आरिफ शेख, मतीन बागवान, शकील मौलवी, शफीक रचभरे, मुन्ना शेख, सहप्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मिरवणुक प्रमुख सय्यद याकुब शेख (MR) यांनी केले. तर सर्वांचे आभार मिडिया प्रमुख अयाज दिना यांनी मानले.
निवड झालेले इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे
कार्याध्यक्ष ताजोद्दीन हत्तुरे
उपाध्यक्ष सईद नाईकवाडी
जनरल सेक्रेटरी शौकत पठाण
सेक्रेटरी जावीद खैरदी
खजिनदार राजू हुंडेकरी
मिरवणुक प्रमुख राजू कुरेशी
मिरवणुक प्रमुख सय्यद याकूब शेख (MR)
मिरवणुक प्रमुख ईस्माईल शेख
सजावट प्रमुख कलीम तुळजापुरे, नजीब शेख,
सोहेल कुरेशी, अशफाक बागवान