नातेपुते जवळ पहाटे भीषण अपघात ; चार जण जागीच ठार तीन जण जखमी ; कास पठार पाहताच आले नाही
सोलापूर : सातारा जिल्ह्यातील कास पठार पाहण्यासाठी निघालेल्या बलेनो कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन चार जण जागीच ठार झाले. ही घटना पंढरपूर पुणे रोडवरील नातेपुते या ठिकाणी रविवारी पहाटे घडली या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
राजेश अनिल कुमार शहा वय 54, दुर्गेश शंकर घोरपडे वय 27, कोमल विशाल काळे वय 32, शिवराज विशाल काळे वय 9 असे या अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत. तर या अपघातात पल्लवी बसवेश्वर पाटील वय 30, अश्विनी दुर्गेश घोरपडे वय 24, आकाश दादा लोंढे वय 25 हे तिघे जखमी झाले आहेत.
यातील मयत व जखमी हे पुणे जिल्ह्यातील वालचंद नगर येथील रहिवासी असून बलेनो गाडी क्रमांक एम एच 42 ए एस 0564 या गाडीतून ट्रीप साठी सातारा
जिल्ह्यातील कास पठार या ठिकाणी जात होते. वाहन हे नातेपुते जवळील ब्रिजवर चुकीच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या मालवाहतूक टेम्पोची समोरासमोर जोराचे धडक झाली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळतात महामार्गावरील 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे डॉक्टर युवराज काळे व पायलट नितीन वाघमोडे यांनी तातडीने जखमींना नातेपुते ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले.