अखिल भारतीय गवळी समाजाचे सोलापूरात होणार राष्ट्रीय अधिवेशन




सोलापूर : अखिल गवळी समाज महासंघ आयोजित अखिल भारतीय गवळी समाज अधिवेशन 2024 मध्ये घेण्यात येणारे विषय व ठराव याबाबतचे चर्चासत्र किल्लेदार मंगल कार्यालय, सोलापूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
प्रारंभी शिवपार्वतीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन झाले. याप्रसंगी मंचावर ज्ञानेश्वर अंजीखाने, नारायण बहिरवाडे (चिंचवड पुणे), सुरेश शहापूरकर, रमेश अंबरखाने, वसंत नामागवळी (मनमाड), प्रवीण हुंडीवाले (अकोला), संगीता लकडे (चाळीसगाव), प्रा किसन झिपरे (अक्कलकोट) श्री प्रा.भालचंद्र हूच्चे (उस्मानाबाद) , अनिल नायकु, शंकर झारखंडे, व्यंकटेश लंगोटे (रायचूर ), सुहास भागानगरे (हैद्राबाद ), सुरेखा अंजीखाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ज्ञानेश्वर अंजीखाने म्हणाले, गवळी समाजाचे 56 वर्षानंतर होणारे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी चार राज्यातील समाज बांधव एकत्र येत आपले योगदान द्यावे असे आवाहन केले. यानंतर या चर्चासत्रामध्ये समाजातील सामाजिक, शैक्षणिक, शासकीय त्याचबरोबर राजकीय विषयांवर आधारित तब्बल 25 ठराव मांडण्यात आले व उपस्थित समाज बांधवांनी या ठरावांना मान्यता दिली. चर्चासत्राच्या मध्यांतरानंतर चार राज्यातून आलेल्या कारभारी, दैवमंडळी, समाज प्रमुख व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी खुल्या चर्चांमधून समाजापुढे अनेक विषय ठेवत आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी चारही राज्यांच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कारभारी, दैवमंडळी, पंच यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
नारायण बहिरवाडे म्हणाले, समाजाने काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे. आपल्या या समाज व्यवस्थेमध्ये काळानुरूप बदल करत समाजाचा विकास साधूया तसेच जास्तीत जास्त शासकीय योजना मिळवूया असा आशावाद व्यक्त केला. रमेश अंबरखाने बोलताना म्हणाले, गवळी समाजातील सर्व पोटजाती एकत्र येऊन शासन दरबारी आपण आपल्या मागण्या मान्य करून घेऊया, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी बोलताना सुरेश शहापूरकर म्हणाले, एका नव्या परिवर्तनाची ही सुरुवात आहे समाजाची एकजूट साधन सामाजिक विकास घडवून आणू, असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी रानसर्जे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर अंजीखाने यांनी मांडले. या चर्चासत्राप्रसंगी गंगाधर औशीकर(नांदगाव ), शिवाजी पंगुडवाले(धाराशिव), विजयदत्त लकडे, प्रभाकर जानगवळी, संजय जानगवळी, सविता नायकू, शैला अंजीखाने, अर्चना अंजीखाने, संजय शहापूरकर, राजू परळकर, राहुल दहिहंडे, कृष्णा भास्कर, पांडू परळकर श्रीकृष्ण झिपरे, किसान अंजीखाने, सिद्धू बडवणे, केदार जानगवळी, मनोज मलकुनाईक या मान्यवरांसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, व तेलंगणा या राज्यातील विविध गावांमधून, शहरांमधून जवळपास साडेतीनशे कारभारी दैव पंच आणि समाज प्रमुख यांची उपस्थिती लाभली. हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी तुकाराम अंजिखाने, आप्पा पंगुडवाले, बाबू औरंगे, राजू दहीहंडे, मल्लिकार्जुन परळकर, दत्तात्रय खंडेराव, किरण रानसर्जे, उदय मिसाळ ( पंढरपूर) यांनी परिश्रम घेतले.