“अभी नहीं तो कभी नहीं ” मोची समाजाचे नेते एकवटले ! हे तिघे करणार काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्ये मतदार संघाच्या काँग्रेस पक्षाचे आमदार प्रणिती शिंदे या विजय झाल्या त्या खासदार झाल्याने शहर मध्ये या मतदारसंघात आता इतरांना संधी उपलब्ध झाले आहे. आज पर्यंत काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयात या मतदारसंघातील मोची समाजाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. शहर मध्य मध्ये समाजाची सुमारे 50 ते 60 हजार मतदारांची संख्या आहे आणि हा मतदार कायमच काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे.
त्यामुळे यंदा काँग्रेस पक्षाने मोची समाजाला आमदारकीची संधी द्यावी यासाठी समाजातील कार्यकर्ते उत्साही झाले आहेत मोची समाजातून माजी महापौर संजय हेमगड्डी यांच्यासह युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे हे इच्छुक असल्याचे पाहायला मिळाले.
आता नाही तर कधीच नाही या भूमिकेतून आता मोची समाज आक्रमक झाला असून बुधवारी हॉटेल कामत मध्ये मोची समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. महापालिकेचे माजी सभागृह नेते समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी अध्यक्ष प्रा नरसिंह आसादे मोची समाजाचे जनरल सेक्रटरी अंबादास करगुळे, सिद्राम कामाठी, उपाध्यक्ष नागनाथ कासोलकर, बसवराज म्हेत्रे, दिनेश म्हेत्रे, रतिकांत कमलापुरे, सिद्राम अट्टेलुर, हणमंतू सायबोलू, विभागीय अध्यक्ष करेप्पा ज॔गम, शिवराम जेगले, अर्जुन साळवे, ईश्वर म्हेत्रे, विजय मरेड्डी, बाबु विटे, अंबादास नाटेकर, यलप्पा बुगले, नागेश म्हेत्रे यांची उपस्थिती होती.
या बैठकीत देवेंद्र भंडारे, संजय हेमगड्डी आणि बाबा करगुळे हे तिघे शहर मध्य मधून काँग्रेस पक्षातर्फे इच्छुक असून इतर कुणीही इच्छुक असतील त्या सर्वांनी मागणी करा, ज्यांना उमेदवारी मिळेल समाज म्हणून त्याच्या पाठीशी राहायचे ठरले आहे. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांची तीन ऑगस्ट रोजी भेट घेऊन त्यांना समाजाच्या वतीने निवेदन द्यायचे आणि इच्छुकांपैकी एकाला काँग्रेसची उमेदवारी मिळावी अशी मागणी करायचे ठरले आहे.