अरे व्वा ! माझी वसुंधरा अभियानात सोलापूर जिल्हा प्रथम ; DPO वीणा पवार यांचा सत्कार
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली माझी वसुंधरा अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून सोलापूरला विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळालेला आहे.
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सोलापूर जिल्हाची विशेष बैठक घेतली, त्यांनी या बैठकांमध्ये मुख्याधिकाऱ्यांना हरित आच्छादनाचे प्रमाण वाढविणे, सायकल ट्रॅकचे प्रमाण वाढविणे,
तसेच ई व्हेईकल चा वापर वाढवणे यावर विशेष भर देण्यास सांगितला होता. सदर अभियाना करता पुणे विभागाच्या सह आयुक्त माननीय पूनम मेहता तसेच सह आयुक्त दत्तात्रय लांघी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
माझी वसुंधरा अभियान 4.0 यांचे 27 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्याकडून विविध कामगिरी करणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका यांना विविध पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. यामध्ये 1.सोलापूर महानगरपालिका भूमी थिमॅटिक याच्या अंतर्गत दोन कोटी बक्षिसात पात्र ठरली आहे.
2.पंढरपूर नगर परिषद राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळवून तीन कोटी रुपये बक्षीस पात्र ठरली आहे
3.मोहोळ नगरपरिषद राज्यस्तरीय उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळवून दीड कोटी बक्षिसास पात्र ठरली आहे.
4.अकलूज नगर परिषद विभाग स्तरावर प्रथम येऊन 75 लाख रुपये बक्षीसास पात्र ठरली आहे 5.अनगर नगर पंचायत विभाग स्तर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळवून 50 लक्ष बक्षीसास पात्र ठरली आहे.
6.माढा नगरपंचायत विभाग स्तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळवून 50 लक्ष बक्षिसास पात्र ठरली आहे.
या अभियाना करिता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वेळोवेळी बैठका घेऊन तसेच प्रशिक्षण सत्र आयोजित करून, विविध स्पर्धा आयोजित करून व
सदर परीक्षेचा परिपूर्ण अभ्यास करून त्या जास्तीत जास्त गुणांक मिळावे याकरिता परीक्षा आयोजीत करून संपूर्ण जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायती यांची स्पर्धेत उतरण्यासाठी पूर्ण तयारी करून घेतली होती.
संपूर्ण नगर पालिकेचे माझी वसुंधरा अभियान 4.0 याकरिता जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार, सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच शहाजी चव्हाण यांनी याकरिता तांत्रिक तज्ञ म्हणून जिल्हा स्तरावरील कामगिरी पार पाडलेली आहे या अभियानामध्ये जिल्हास्तरावरून पूर्ण वर्षभरात करावयाचे विविध कार्यक्रम व करावयाची कामे याचे वेळापत्रक आखून देण्यात आले होते ,जास्तीत जास्त झाडे लावने, हरित पट्ट्याची निर्मिती करणे, वृक्ष गणनांना करणे ,प्लास्टिक पिशव्यांवर बंदी, शहरात चार्जिंग स्टेशन उभारणे, इलेक्ट्रिक वाहनांना चालना देणे, विहीर पुनर्भरण ,एलईडी पथदिव्यांचा वापर, तसेच
पर्यावरण संबंधी जनजागृती चे विविध कार्यक्रम आयोजित करून व पर्यावरण पूरक ,गणेशोत्सव, होळी, वटपौर्णिमा,दिवाळी हे कार्यक्रम हाती घेऊन शहरात वृक्षाच्या आच्छादनाचे प्रमाण वाढविणे,धुळीचे प्रमाण कमी करणे ,भूगर्भिय पाण्याची पातळी वाढवणे ,असे पर्यावरण संतुलन राखणारे कामे हाती घेण्यात आली आहेत.सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका ,नगरपालिका व नगरपंचायती या कामामुळे मोठे प्रमाणात गुणांक प्राप्त झाले आणि म्हणूनच सोलापूर जिल्हाने
विभाग स्तरावर माझी वसुंधरा4.0 या अभियानात प्रथम क्रमांक मिळवला आहे व जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातील कामगिरीमध्ये यशाच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.