मनीष व रोहन यांना घेऊन आमदार सुभाष बापू देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून रेकॉर्ड विजय मिळवलेले आमदार सुभाष देशमुख यांचे सर्वत्र स्वागत होत आहे. नुकतेच लोकमंगल परिवाराच्या वतीने मार्गदर्शक आमदार सुभाष देशमुख यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच योग्य आहेत अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान नूतन आमदार सुभाष देशमुख यांनी आपले चिरंजीव मनीष देशमुख आणि रोहन देशमुख यांचा सोबत मुंबईमध्ये महायुतीच्या विजयात सिंहाचा वाटा असलेले देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला.
फडणवीस यांनी सुद्धा 77 हजाराच्या फरकाने विजयी झालेले आमदार सुभाष देशमुख यांचा सत्कार केला. सत्ता स्थापनेनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ म्हणून सुभाष देशमुख यांना संधी मिळेल अशी शक्यता सोलापुरात वर्तवण्यात येत आहे.