“बाबा जो बोलता है, वो करता है”….!
सोलापूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले. भारतीय जनता पार्टी या मतदारसंघातून निवडून येण्या पाठीमागे अनेक कारणे आहेत. या निवडणुकीत पद्मशाली समाजानंतर मोची समाज किंगमेकर ठरला आहे.
काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या मोची समाजाच्या काही प्रमुख नेत्यांनी भाजपसोबत जाणे पसंत केले. त्यामध्ये माजी युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांचा समावेश होता.
भाजपच्या एका मेळाव्यामध्ये त्यांनी उमेदवार देवेंद्र कोठे हे चाळीस हजाराहून अधिक मताधिक्याने विजयी होतील असा दावा केला होता त्याप्रमाणेच देवेंद्र कोठे हे तब्बल 48 हजाराच्या फरकाने विजयी झाले.
कोनापूरे चाळ, फॉरेस्ट हा भाग काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. परंतु त्या ठिकाणाहून तब्बल अडीच हजाराचे मताधिक्य भाजपला गेले आहे. यामध्ये बाबा कराlगुळे यांचा मोठा वाटा पाहायला मिळतो. त्यांनी भाजपला दिलेल्या शब्दाप्रमाणे काम करून दाखवले आहे. त्यामुळे “बाबा जो बोलता है, वो करता है” अशी म्हण आता प्रचलित होऊ लागली आहे.