‘सोमनाथ वैद्य’ना पाठिंबा आणि हद्दवाढ विकासाला निधीची मागणी ; बापूचा कार्यकर्त्यांना चांगलीच झोंबली
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विशेष करून हद्दवाढ भागात दक्षिण मधील इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी केली. वैद्य यांना हद्दवाढ भागातील भाजपच्या पाच ते सहा माजी नगरसेवकांनी शिफारस देत उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
यावरून भारतीय जनता पार्टीमध्ये चांगलेच राजकारण पेटले आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना मात्र हे सहन झाले नाही त्यांना चांगलेच झोंबले असल्याचे दिसत आहे.
हद्दवाढ भागातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा दिलेल्या माजी सभागृहनेते श्रीनिवास करली, माजी उपमहापौर राजेश काळे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.
भाजपच्या या माजी नगरसेवकांवर पक्षाने कारवाई करण्याची मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली. आमदार सुभाष देशमुख यांनी हद्दवाढ भागात किती विकास केला याचा कागदोपत्री पुरावा काही कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर सादर केला.
सोमनाथ वैद्य यांचा दक्षिणचा विकास आणि भारतीय जनता पार्टीशी कोणताही संबंध नाही. अशी ही भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.