सोलापुरात बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मयत सूर्यवंशी यांना काँग्रेसची श्रद्धांजली
सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड आणि सहकाऱ्यांच्या वतीने, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ पार्क चौक येथे परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीत मरण पावलेल्या शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांच्या प्रतिमेस सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, मेणबत्त्या पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
परभणीत येथे संविधान प्रतिमेच्या विटंबने नंतर गेली पाच सहा दिवस पासून पोलिसांनी कोंबींग ऑफरेशन करून वकीलीचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यंवशी सह अनेकांना अटक केली होती. अटक केलेल्या सोमनाथचा न्यायालयीन कोठडी मध्ये मृत्यू झाला. त्याचा अटकेची माहिती कुटुंबाला सुद्धा देण्यात आली नव्हती. या मध्ये वादग्रस्त पोलीस निरीक्षक घोरबांड यांचे नाव येत आहे. पोलीसांनी केलेल्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाला आहे का? सोमनाथ यांचे मृत्यू प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. हा मृत्यू आहे की व्यवस्थेने केलेला खून आहे. याची तातडीने चौकशी होवून संबंधीत दोषीवर कारवाई करण्यात यावी. आज रोजी सोलापूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड आणि सहकाऱ्यांच्या वतीने शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत.
यावेळी अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष मयूर खरात, अँड संघमित्रा चौधरी, तिरूपती परकीपंडला, राजेंद्र शिरकुल, विवेक कन्ना, अभिषेक गायकवाड, नागेश म्याकल, धम्मा जगजाप, परशुराम सतारेवाले, पृथ्वीराज नरोटे, श्रीपती खरात, महेश चळवादी, चैतन्य केंगार, राजेश झंपले, अक्षय गायकवाड, अजिंक्य गायकवाड, प्रज्वाज कांबळे, सागर गायकवाड, अंकुश बनसोडे, महादेव येरनाळ, अजित जाधव, नागनाथ शावणे, व्यंकटेश बोम्मेन, महेश वड्डेपल्ली यांच्यासह इतर उपस्थित होते.