सोलापुरात बागवान जमीयत ट्रस्ट आली मदतीला धावून ; आग लागून झाले होते 22 लाखाचे नुकसान
सोलापूर : 19 मार्च दुपारी तीन वाजता विठ्ठल नगर येथे तीन हजार स्क्वेअर फुट मध्ये वेस्टेज मटेरियलचा नबीलाल मेहबूब बागवान यांचा मालकीचा गोडवान असलेल्या जागी आग लागल्याने तब्बल 22 लाख रुपये किंमतीचा माल जळून खाक झाला.
ही माहिती समजताच सोलापूर शहर- जिल्हा बागबान जमियत ट्रस्ट ची टीम घटनास्थळी पोहोचली. नबीलाल बागवान यांनी माहिती देताना सांगितलं की बुधवारी दुपारी तीन च्या दरम्यान आठ महिला गोडवान मध्ये काम करत असताना अचानक आग लागली आणि गोडवान मध्ये असलेला सगळं वेस्टेज मटेरियल जळून खाक झाले. लाखो रुपयांचा नुकसान नबीलाल बागवान यांचा झाला असता सोलापूर शहर जिल्हा बागबान जमियत ट्रस्ट कडून नबीलाल बागवान यांना 25 हजार रुपये रोख रक्कम ची मदत करण्यात आली .
नबीलाल बागवान यांचा याच धंद्यावर उदरनिर्वाह होता म्हणून सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्टचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी सर्व बागवान जमियतचे व्यापारी अडते व उद्योजक यांना आवाहन केले आहे की, रमजान महिन्यांमध्ये ही घटना अत्यंत धक्का देणारी आहे. म्हणून आपण नबीलाल बागवान यांना आपापल्या सोयीनुसार आर्थिक मदत करावी.
त्याप्रसंगी जमियतचे उपाध्यक्ष अनवर बागवान, सेक्रेटरी हाजी इलियास बागवान, जॉईन सेक्रेटरी आबिद बागवान, शोएब चौधरी, आरिफ मर्चंट आदी उपस्थित होते.