सीईओ मनिषा आव्हाळे यांची क्यूट कन्या जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत ; चिमुकलीने खिचडी खाल्ली, केला एन्जॉय
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी एक चांगला आदर्श घालून दिला आहे. स्वतःच्या चिमुकल्या कण्येस त्यांनी जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीमध्ये पाठवून त्या ठिकाणी तिथली खिचडी सुद्धा खायला घातली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सोलापूर जिल्ह्यात आदर्श अंगणवाडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पहिलं पाऊल अंगणवाडीत, शिक्षणाचा पाया इथूनच पक्का होतो त्यासाठी त्यांचं लक्ष महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी कडे आहे.
दरम्यान स्वतः च्या मुलीला त्यांनी गुरुवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावातील अंगणवाडीत पाठवले. आव्हाळे यांची चिमुकली तिथे मुलांमध्ये रमून गेली, त्याठिकाणी मुलांसाठी करण्यात आलेली खिचडी सुद्धा तिने खाल्ली. सीईओ यांची कन्या इथे आल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस सुद्धा भारावून गेल्या होत्या.