सोलापूरच्या कल्याण नगरला कोणी वाली नाही ! राष्ट्रवादीच्या कविता कोडवान आल्या धावून
सोलापूर : सोलापूर शहरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. महापालिकेकडून नाले सफाई होत नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही म्हणून पाणी थेट नागरिकांच्या घरात घुसते. प्रत्येक वर्षी मोठ्या पावसानंतर आसरा चौका जवळील कल्याण भाग दोन हा पाण्यात असतो, नागरिकांना ती रात्र जागून काढावी लागते.
या भागाचे माजी नगरसेवक ‘आम्हाला मतदान केलेलं नाही, आम्ही काम करणार नाही’ असे नागरिकांना उत्तर असते. त्यामुळे या भागातील नागरिकानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोलापूर दक्षिण विधानसभा अध्यक्ष कविता कोडवान यांना फोन लावला.
तेव्हा कविता कोडवान यांनी घटना स्थळी जावून प्रमुख नाल्याची पाहणी केली. तत्काळ झोन क्र.5 च्या अधिकारी यांना बोलावून घेतले. नाला साफ करुन नागरिकाची सोय करुन दिली.