भाजपच्या सुभाष देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यात केला हा रेकॉर्ड ; मनीष देशमुख ठरले विजयाचे शिल्पकार
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक करणारे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यात मताधिक्याचा नवा रेकॉर्ड केला आहे. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तब्बल 77 हजार हून अधिक मताधिक्य घेत विजय संपादन केला. त्यांच्या या विजयात त्यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांचा मोलाचा वाटा असल्याचे पाहायला मिळाले.
सुभाष देशमुख दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सलग तीन टर्म आमदार झाले आहेत. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार दिलीप माने यांचा पराभव करत 28 हजाराचे मताधिक्य मिळवले होते त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यानी काँग्रेसच्या बाबा मिस्त्री यांना पराभूत केले तेव्हा ते 29 हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले. 2024 च्या निवडणुकीत मात्र सुभाष देशमुख यांनी तब्बल 77 हजार हून अधिक मताधिक्य घेत सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांचा पराभव केला.
यापूर्वी सर्वाधिक मताधिक्य घेण्याचा पराक्रम भाजपचे आमदार शहर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नावावर होता. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 73 हजाराचे मताधिक्य घेतले होते. त्यानंतर हा विक्रम माढयाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या नावावर होता त्यांनी 68 हजार इतके मताधिक्य घेतले होते. या दोघांचा विक्रम सुभाष देशमुख यांनी मोडला आहे.
सुभाष देशमुख यांच्या विजयात त्यांचे चिरंजीव युवा नेते मनीष देशमुख यांचा सिंहाचा वाटा पाहायला मिळतो. ज्यावेळी सुभाष देशमुख विजय झाले तेव्हा ते मतमोजणी केंद्रावर आले होते. याचवेळी बाप लेकांची गळा भेट झाली. मनीष देशमुख यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले.
या भेटीवर कार्यकर्त्यांनी लिहिले आहे की,
घोषणांचा निनाद आसमंतात घूमला. बापू शुभेच्छा स्वीकारत असताना अचानक पायावर डोके ठेवले गेले. कोण आहे असे पाहिले तर चक्क भैय्या.. मनीष भैय्यानी आपल्या अश्रूंनी बापूंच्या पायावर अभिषेक केला. दुसऱ्याच क्षणी बापूंनी मनिष भैय्याना छातीशी कवटाळले. पाठीवर शाबासकीची थाप दिली. आम्हा सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.
दररोज 20 तास मेहनत. शेकडो लोकांच्या गाठीभेटी, बोलून बोलून मुखातून शब्द सुध्दा निघायचा अवघड झाला अशी मेहनत, परफेक्ट नियोजन, कार्यकर्त्याचा रुसवा असो फुगवा दूर करणे की कुणाचे समाधान यावर इलाज रूपी डॉक्टर म्हणजे मनीष भैय्या. नियोजन सोबत सातत्याने गाठीभेटी, पदयात्रा, नेत्यांच्या सभा, बूथ यंत्रणा यांसाठी मनीष भैय्याच. बापूंच्या विजयाचे तंत्रशुद्ध मॅनेजमेंट यशस्वी करणारे मनीष भैय्याच. या निवडणुकीचे बॅक बोन , संयोजक, रियल हिरो मनीष भैय्या देशमुखच.