भयानक ! सोलापुरात अग्नी तांडव, आगीत होरपळून चार जणांचा मृत्यू? ; अजून पाच जण अडकल्याची माहिती
सोलापूर : अक्कलकोट रोड एम आय डी सी मधील सेंट्रल टेक्सटाइल मिल मध्ये आज शनिवारी पहाटे साडे चारच्या दरम्यान लागलेल्या आगीत चार कामगार होरपळून मरण पावल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू असून अजून चार ते पाच अडकल्याची माहिती मिळत आहे. मयतांची ओळख पटलेली नाही. संबंधित टेक्स्टाईलचा मालक तिथेच राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
पहाटेपासून या भागामध्ये पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, अग्निशामक दल यांचे आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आठ ते दहा गाड्या पाणी मारून झाले तरीही आटोक्यात येत नाही. याआधी मध्ये आत अडकलेल्या अनेक जणांना बाहेर काढण्यात आले असून यात चार जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती सांगण्यात आली. मृतदेह शासकीय रुग्णालयात हालवण्यात आले आहेत.
पहाटे साडेचार च्या दरम्यान 108 ॲम्बुलन्सला फोन करण्यात आला. त्यानुसार कुंभारी सब सेंटर, मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सोलापूर जिल्हा रुग्णालय या ठिकाणाहून तीन ॲम्ब्युलन्स घटनास्थळी रवाना झाल्या.