अमोल दळवी शिवसेना पॅरामेडिकल सेलचे सोलापूर जिल्हा प्रमुख
सोलापूर येथील आधार हॉस्पिटलचे रेडिओलॉजी व एक्स-रे टेक्निशयन अमोल भागवत दळवी यांची सोलापूर पॅरामेडिकल विंग जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. शिवसेना महाराष्ट्र राज्याचे पॅरामेडिकल सेलचे प्रदेश प्रमुख राहुल मापारी यांनी ही नियुक्ती केली आहे. अमोल दळवी यांच्या नियुक्ती बद्दल सोलापुरातील सर्व स्तरातील अभिनंदन होत आहे.
या नियुक्ती बद्दल अभिनंदन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनहित कार्याचा प्रचार व प्रसार तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करावे असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.