“ओ जेवणवाले”आम्हाला पण, चपाती भाजी देताव का….
हा प्रश्न आहे रस्त्यावरती राहणाऱ्या माणसाचा ? हा प्रश्न आहे हॉस्पिटलच्या बाहेर आपले नातेवाईक आत कशे असतील, बरे कधी होतील असा विचार करत असलेल्या लोकांचा…..सगळं काय बंद केलं पण “भुकेला वेळ ठरलेली असतें आणि वेळेला पोटात काही तरी गेलं पाहिजे” पण सद्य परिस्थीती बर्याच जणांसाठी खूप वेदनादायी आहे…. रस्त्यावर राहणाऱ्या, हॉस्पिटल मधे ॲडमिट असणाऱ्या पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळच जेवण.
आस्था रोटी बँक म्हणजे”आस्थेनी समाजाला जोडणारी” माणस. हि पदवी मिळाली आहे रस्त्यावर राहणाऱ्या बेघर आणि कोरोनाने त्रस्त झालेल्या माणसांकडून. होय सध्या जी परिस्थीती आहे त्यात लोक एकमेका मध्ये अंतर ठेऊ लागली पण त्याच्यात माणुसकी अजून शिल्लक आहे हे प्रकर्षाने आणि सातत्याने कोरोना मुळे lockdown लागल्या पासून म्हणजे मार्च 2020 पासून आज रोजी पर्यंत अविरतपने स्वताच्या जीवाची पर्वा न करता गरजू लोकांना 2 वेळचे जेवण मिळावं यासाठी धडपड करणाऱ्या माणसांचा समूह …. जिथे अन्न शिल्लक राहतं तिकडून आस्था रोटी बँक ते गोळा करत आणि गरजू पर्यंत पोचवण्याच काम गेल्या अनेक वर्षापासून सुरूच आहे…. सध्या जवळपास 800 लोकांना दोन वेळच जेवणं पुरवण्याचं काम सस्थेमार्फत पुरवलं जातं. समाजातल्या दानशूर आणि सामाजिक भान असलेल्या असंख्य लोकांकडून मिळालेल्या या अन्नाला योग्य ठिकाणी पोचवण्याच काम संस्थेमार्फत गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे .
हे अन्न वाटप भगवानदास झोपडपट्टी, सिद्धेश्वर नगर झोपडपट्टी, रेल्वे स्टेशन परिसर, बाळवेस येथील वडार गल्ली, घोंगडे वस्ती परिसर, जोडबसवांना चौक परिसर, श्रीशैल नगर झोपडपट्टी, व विविध हॉस्पिटल मध्ये अन्न वाटप करण्यात आले आहे.
आपण अन्नदान करून एक प्रकारचे सामाजिक सेवा बजावू शकता.
संपर्क-
विजय छंचुरे- 9096452778
आनंद तलिकोटी- 942264455






















