सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला आहे या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये संतापाचे वातावरण आहे एकीकडे इंदापूरचे आमदार पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूरचे नियोजित एक थेंबही पाणी मी घेऊन जाणार नाही असे सांगत असताना दुसरीकडे मात्र सोलापूरच्या वाटयातीलच पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेले जाणार आहे असे लोकप्रतिनिधी सांगत आहेत या विषयावर इंदापूरचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री सर्वांचे लक्ष झाले आहेत याच पार्श्वभूमीवर करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील शिवसेनेचे माढा तालुक्यातील नेते संजय कोकाटे यांनी शुक्रवारी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली.
कोरूनाच्या पार्श्वभूमीवर उजनीतून जाणाऱ्या पाण्याच्या विरोधात आंदोलन करता येत नाही मात्र या विषयावर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भूमिका बाहेर न येता सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन लढा उभारावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी येत्या रविवारी शासकीय विश्रामगृहात सर्व लोकप्रतिनिधी सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांची बैठक घेऊन समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे हा जनतेचा विषय आहे या विषयावर प्रसंगी न्यायालयात जाण्याची भूमिका त्या दोन नेत्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे पुण्यात झालेल्या बैठकीत आंदोलनाचा वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वांनी एकत्र येऊन यासाठी लढा उभा करण्यासाठी आमची भूमिका असल्याचे नारायण पाटील व संजय कोकाटे म्हणाले.
मुख्यमंत्री हे आमच्या पक्षाचे आहेत त्यांनी या आदेशावर सही केल्याचे समजते मात्र सुरुवातीला आम्ही सत्य परिस्थिती त्यांच्या समोर मांडू, त्यांची दिशाभूल करून सही घेतली असेल ते त्यांच्या लक्षात आणू आणि त्यांना निर्णय बदलण्यास भाग पाडू अशी भूमिका नारायण पाटील यांनी मांडली.



















