करण म्हेत्रे अंत्यविधी पोलीस धक्काबुक्की प्रकरणातील 50 जणांना अंतरिम जामीन मंजूर
मोची समाजाचे युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या मृत्यूनंतर निघालेल्या अंतयात्रेला हजारोंचा जनसमुदाय
उसळला होता यामध्ये पोलिसांनी अटक केल्यानंतर काहीसा गोंधळ उडाला आणि संतप्त झालेल्या युवा कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली यानंतर अशा वातावरणातच आणि हजारोंच्या उपस्थितीत करण म्हेत्रे यांचा अंत्यविधी झाला त्यानंतर पोलिस प्रशासनाने सुमारे अडीचशे जणांवर गुन्हा दाखल केला, त्यामध्ये काही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते तसेच पोलीस प्रशासनाने तब्बल दोन किलोमीटरच्या अंतरावर कंटेनमेंट झोन करून सर्व एरिया सील केला आहे, सर्व घरोघरी जाऊन कोविड टेस्ट सुरू आहे, पोलीस प्रशासनाकडून झालेल्या या कारवाईनंतर मोची समाज ख्रिश्चन समाज लोधी समाज यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या 50 जणांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे यात आरोपीतर्फे एडवोकेट अमित आळंगे, ऍड विद्यावंत पांढरे, ऍड शुभम माने , ऍड शाहनवाज शेख यांनी काम पाहिले तर सरकारच्या वतीने ऍड आनंद काळे यांनी काम पाहिले.



















