2020 साली कोरोनाच्या सुरुवातीला सोलापूरात परिस्थिती बिघडत चालल्यामुळे निर्णय न घेणाऱ्या व दबकत काम करणाऱ्या तत्कालीन महापालिका आयुक्त दीपक तावरे यांची राज्य सरकारने तडकाफडकी उचलबांगडी केली, त्यांच्या जागेवर वखार महामंडळावर व्यवस्थापकीय संचालक पी शिवशंकर यांची नियुक्ती केली,
सुरुवातीला शिवशंकर यांनी धडाकेबाज निर्णय घेतले, हॉस्पिटल वर कारवाया केल्या, कोरोन्टाईन बाबत नवा नियम आणला, महापालिका प्रशासनात सुधारणा केली, त्यांचे काम पाहून सोलापूरकरानी त्यांची वाहवा केली, पहिला चुकीचा निर्णय घेतला तो म्हणजे कोरोन्टाईन सेंटर मधील जेवणाचा ठेका बदलला, चांगले जेवण मिळत असताना त्यांनी पैसे वाचवायच्या हेतूने एका महिलेच्या बचतगटाला ठेका दिला पण अत्यंत निकृष्ट पद्धतीचे जेवण देण्यात आले. दुसऱ्या लाटेची चर्चा सोलापूरात झाली, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने यंत्रणा सज्ज ठेवायला हवी होती, मात्र सर्व सेंटर बंद केले, वाडिया बंद केला, विमा हॉस्पिटलकडे लक्ष दिले नाही, कोविडची सर्व यंत्रणा बंद करत, कर्मचारी अधिकारी इतर कामात वळवले, महापालिकेला आपले आहेत ते सर्व दवाखाने सुसज्ज करण्याची मोठी संधी होती परंतू, आयुक्त शिवशंकर यांनी दुलक्ष केले,
आता एप्रिल 2021 मध्ये कोरोनाची दुसरी आणि भयंकर लाट आली, त्यात युवा वर्ग बाधित झाला, शहरातील चांगली चांगली लोक मरण पावली, अनेक कुटुंब उध्वस्त झाली, अशात आयुक्त ग्राउंड लेव्हलला फिरताना दिसले नाहीत, त्यांच्या मर्जीतील अधिकारी हे फक्त कार्यालयात बसूनच काम करतात , काही अधिकारी तर केवळ मीडियाला बाईट देण्यापूरते काम करतात, ज्या अधिकाऱ्यांनी शहराचा सगळा भार आपल्या खांद्यावर घेतलाय तेच पळताना दिसत आहेत, शहरात दुसऱ्या लाटेत नवे बॉईज हॉस्पिटल दुरु झाले, वाडिया कोविड सेंटर सुरू झाले, सिंहगड, पोलीस प्रशिक्षण केंद्र, शासकीय तंत्र निकेतन तसेच जुळे सोलापूरातील म्हाडा या इमारती कोरोन्टाईन सेंटर म्हणून घेण्यात आल्या, राज्य कामगार विमा हॉस्पिटलमध्ये 80 ऑक्सिजन बेड सुरू झाले,
एकीकडे अशी चांगली सुधारणा झाली ही निश्चितच चांगली गोष्ट आहे पण आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे, ही लाट तर लहान बालकांसाठी भीतीदायक आहे अशी माहिती आहे , याच पार्श्वभूमीवर शहरातील रुग्ण संख्या कमी होत आहे यामुळे महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी सिंहगड इन्स्टिट्यूट, शासकीय तंत्रनिकेतन, वाडिया ही कोव्हीड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आणि अचानक शेकडो नागरिकांना महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रात हलवले त्यावर बराच गोंधळ झाला, कोविड सेंटरच्या जेवणावर सुद्धा गोंधळ होतो, नागरिक ओरडतात, मात्र याचे आयुक्तांना काही देणं घेणं नाही, चांगल्या प्रतीचे जेवण देणे ही जबाबदारी असताना यात आयुक्त असे का वागतात भूमिका ही संशयास्पद असल्याचा आरोप आहे, कुठल्या आयुक्ताला स्वतःच्या खिशातून द्यायचे आहे का, असा ही सवाल नागरिक उपस्थित करतात, प्रत्येक आमदार आपल्या निधीतून एक कोटी रुपये केवळ कोरोनासाठी देत आहे शहरात 3 आमदार आहेत, एक विधान परिषदेचा आमदार असून त्या निधीतून सुसज्ज अशी आरोग्य यंत्रणा उभारता येईल मात्र आयुक्त किती प्रयत्न करतात असा प्रश्न आहे, एकूणच मागील वर्षभरातील महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांचा कोरोना काळातील कारभार म्हणजे “नव्या नवरीचे, नऊ दिवस ” अशी टीका शहरवासीयांतून पुन्हा होत आहे.

















